हॉट योग गुरूने बसविले लोणावळ्यात बस्तान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 16:48 IST
योगाभ्यास शिकविताना शिष्य व सहकारी महिलांवर बलात्कार व लैंगिक छळ केल्याप्रकरणी अमेरिकेत खटला सुरू असलेले हॉट योगगुरु बिक्रम चौधरी याने अमेरिकेतून पलायन करून आता महाराष्ट्रतील लोणावळ्यात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे.
हॉट योग गुरूने बसविले लोणावळ्यात बस्तान
योगाभ्यास शिकविताना शिष्य व सहकारी महिलांवर बलात्कार व लैंगिक छळ केल्याप्रकरणी अमेरिकेत खटला सुरू असलेले हॉट योगगुरु बिक्रम चौधरी याने अमेरिकेतून पलायन करून आता महाराष्ट्रतील लोणावळ्यात आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. ५९ वर्षीय योगगुरुने आपल्या बस्तानासाठी लोणावळा येथील अॅम्बी व्हॅलीची निवड केली आहे. चौधरीच्या माजी महिला वकिलानेही त्याच्या लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणात चौधरीला संबंधित महिलेला ७.५ मिलियन डॉलरची भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या सर्व कटीकटीला वैतागून बिक्रम चौधरी भारतात तर जम बसवित नाहीना असे बोलले जात आहे.