(Image Credit : bustle.com)
केसांची काळजी घेण्याबाबत सगळेच कॉन्शस असतात. मग ते पुरूष असो वा महिला. याचं कारण म्हणजे सगळ्यांचा लूक त्यांच्या केसांवरच अवलंबून असतो. अशात जर आपण आपल्या केसांसाठी वेगळी अशी काळजी घेत नसू तर कमीत कमी बेसिक काळजी कशी घ्यावी हे आपल्याला माहीत असायला हवं. जेणेकरून केस आपल्याला आयुष्यभर साथ देतील.
तापमान महत्वाचं ठरतं
गरम आणि थंड, केस धुण्यासाठी किंवा शॅम्पू करण्यासाठी दोन्ही प्रकारचं पाणी वापरण्याचे फायदे आणि नुकसान आहेत. कारण पाण्याचं तापमान निश्चितपणे केसांच्या आरोग्यावर प्रभाव टाकतं.
गरम पाण्याने केस धुण्याचे फायदे आणि नुकसान
१) सध्या हिवाळा सुरू आहे त्यामुळे आधी गरम पाण्याच्या वापराने फायदे आणि नुकसान जाणून घेऊ. गरम पाण्याने शॅम्पू करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, याने त्वचेवरील रोमछिद्रे मोकळे होण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचेला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतं आणि हेअर ग्रोथसाठी आवश्यक ब्लड सर्कुलेशनही वाढतं. गरम पाण्याने केसांच्या मुळात जमा झालेलं तेल, धूळ-माती आणि घाम स्वच्छ होते.
२) गरम पाण्याने केस धुण्याचे काही नुकसानही आहेत. यात सर्वात पहिलं नुकसान हे आहे की, हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतल्यास केस ड्राय होतात. ही समस्या दूर करण्यासाठी शॅम्पूनंतर केसांवर कंडीशनर वापरलं तर फायदा होईल.
३) गरम पाण्याचा वापर केसांवर करण्याआधी केसांना तेल लावा. रात्री केसांना तेल लावून मसाज करा. याने केस ड्राय आणि डॅमेज होणार नाहीत. जर तुम्ही असं केलं नाही तर केस ड्राय होतील आणि केसांचा चमकदारपणाही जाईल.
४) गरम पाण्याने शॅम्पू करतेवेळी याची काळजी घ्या की, शॅम्पू लावताना थोडं गरम पाणी वापरा. जेणेकरून केसांमधील धूळ-माती, तेल निघून जाईल. शॅम्पू केल्यानंतर मग कोमट पाणी वापरा.
थंड पाण्याचा वापर करण्याचे फायदे आणि नुकसान
१) जर तुम्ही केसांना शॅम्पू करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करत असाल तर याने तुमच्या त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतील. ज्याने केसांमधील मॉइश्चर बाहेर येऊ शकणार नाही आणि तुमचे केस ड्राय होत नाही. तसेच थंड पाण्याने केसांना न्यूट्रिएंट सुद्धा मिळतात.
२) थंड पाण्याने शॅम्पू केल्याने केसांच्या मुळातून एक्स्ट्रा आणि डेड सेल्स दूर होतील. ब्लड सर्कुलेशन मेंटेन राहतं आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते. पण सोबतच याने केस पातळ होतात. हे त्यांच्यासोबत अधिक होतं जे लोक अनहेल्दी आहार घेतात.
३) थंड पाण्याचा वापर शॅम्पू करण्यासाठी करत असाल तर याने हिवाळ्यात केसगळतीची समस्या वाढते. उन्हाळ्यातही फार जास्त थंड पाण्याने केस धुवू नये. खासकरून या वातावरणात गरम पाण्याचे केस धुवायला सुरूवात करा आणि नंतर कोमट पाण्याचा वापर करा. केस धुतल्यानंतर कंडीशनरचा वापर करावा.