शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात अंगाला खाज येण्यामुळे हैराण आहात ? तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 10:23 IST

उन्हाळ्यात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं. उन्हाळा सुरु होताच गर्मी होणे, घाम येणे आणि त्यासोबतच अंगाला खाज येण्यासारखे प्रकार सुरु होतात.

(Image Credit : Thompson Tee)

उन्हाळ्यात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं. उन्हाळा सुरु होताच गर्मी होणे, घाम येणे आणि त्यासोबतच अंगाला खाज येण्यासारखे प्रकार सुरु होतात. अंगाला खाज येणं ही एक अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की अंगावर घामोळ्या येण्यास सुरुवात होते यामुळे त्वेचेला खाज येणे तसेच जळजळ होण्यास सुरुवात होते.

त्वचेला येणारी खाज आणि घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि त्रस्त झाला आहात तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही या त्रासावर मात करु शकाल. चला तर मग पाहूयात काय आहेत हे उपाय…

१) त्वचेला येत असलेल्या खाजमुळे अनेकजण त्रस्त असतात यावर घरगुती उपाय म्हणजे बर्फाचे तुकडे खाज येणा-या जागेवर लावावेत. यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो. तसेच बर्फाचे तुकडे एका कपड्यात गुंडाळुन पाच ते दहा मिनिटांपर्यंत खाज येत असलेल्या जागेवर लावावे. चार ते सहा तासांच्या अंतरामध्ये अशा प्रकारे तुम्ही बर्फाचे तुकडे खाज येत असलेल्या जागेवर लावू शकता. 

२) शरीराला येत असलेली खाज थांबविण्यासाठी मिठ, हळद आणि मेथी यांचे मिश्रण करा. तसेच हे मिश्रण आंघोळीपूर्वी अंगावर पाच मिनिटांपर्यंत लावावे. त्यानंतर पाच मिनिटांनी आंघोळ करावी. आठवड्यातुन एकदा अशा प्रकारे उपाय केल्यास त्वचेला होणारी जळजळ आणि खाज रोखण्यास मदत होते.

३) उन्हापासून वाचण्यासाठी त्वचेचा रुक्षपणा कमी करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरू शकते. त्वचेवर कोरफड जेलसुद्धा लावता येऊ शकते. 

४) उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती त्वचेसाठी खुपच फायदेशीर ठरते. जर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीचा लेप लावावा त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.

५) उन्हाळ्यात येणारा घामाचा वास, अंगाला खाज येणे तसेच जळजळ होण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी दररोज स्वच्छ आणि ताज्या पाण्यात आंघोळ करावी. पाण्यात काही कडूलिंबाची पाने टाकल्यास फार उत्तम.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स