शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

आरोग्यम् धन संपदा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 11:23 IST

मानवी प्रकृतीनुसार प्रत्येक ऋतु व्यक्तीला हवाहवासा वाटतो. पण या आवडत्या ऋतुतही आपल्याला काही ना काहीतरी त्रास होतच असतो. हिवाळ्यात सर्दी, उन्हाळ्यात उष्माघात तर पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांचा त्रास होतो. विशेष करून पावसाळ्यात अशूद्ध पाणी, थंड वातावरण आणि खाद्यपदार्थांमधील भेसळ यांच्यामुळे व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप, कावीळ, मलेरिया, डेंग्यू, जुलाब यांचा त्रास होतो.

 अबोली कुलकर्णी  ‘आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दिप: ज्योती नमोस्तुते...!’ या संस्कृत उक्तीप्रमाणे स्वत:च्या आरोग्याची काळजी आपण स्वत:च घेणे क्रमप्राप्त असते. आरोग्य चांगले असेल तर आयुष्यातील सुखांचा आपल्याला आनंदाने उपभोग घेता येतो. मानवी प्रकृतीनुसार प्रत्येक ऋतु व्यक्तीला हवाहवासा वाटतो. पण या आवडत्या ऋतुतही आपल्याला काही ना काहीतरी त्रास होतच असतो. हिवाळ्यात सर्दी, उन्हाळ्यात उष्माघात तर पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांचा त्रास होतो. विशेष करून पावसाळ्यात अशूद्ध पाणी, थंड वातावरण आणि खाद्यपदार्थांमधील भेसळ यांच्यामुळे व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप, कावीळ, मलेरिया, डेंग्यू, जुलाब यांचा त्रास होतो. तर पाहूयात नेमक्या कोणत्या ५  बाबींवर लक्ष ठेवल्यास आपण पावसाळयातही निरोगी राहू शकतो. आहार :सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत सगळी धावपळ ही केवळ आपल्या पोटासाठीच तर सुरू असते. मग आपण जे अन्न खातोय ते जर दुषित किंवा भेसळमिश्रीत असेल तर पावसाळ्यात त्याचे वाईट परिणाम आपल्याला सोसावे लागतात. सध्याच्या युवापिढीला रस्त्यावरच्या गाड्यांवरचे पाणीपुरी, भेळ असे उघडे पदार्थ खायला खुप आवडतात. अशा रस्त्यावरच्या उघड्या पदार्थांवर माश्या, डास बसून ते पदार्थ दुषित होतात. त्यामुळे पाणी, अन्न, पदार्थ हे व्यवस्थित निर्जंतुक हातांनी बनवलेल्या ठिकाणचेच खावेत जेणेकरून पोटाचे विकार किंवा जुलाब असे व्याधी होणार नाहीत. आजकाल बºयाच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर निर्जंतुक पदार्थ बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपणही तेवढीच काळजी स्वत:ची आणि कुटुंबियांची घ्यायला हवी. जेव्हा तुम्हाला बाहेरचे उघड्यावरचे अन्नपदार्थ खावेसे वाटतात तेव्हा तुम्ही सुकामेव्याचे सेवन करावे. जेणेकरून पोटात दुषित पदार्थही जाणार नाहीत. आणि पौष्टिक पदार्थही शरीराला मिळतील.इन्फेक्शन/अ‍ॅलर्जी : पावसाळ्यात आहारानंतर सर्वांत मोठा धोका इन्फेक्शन आणि अ‍ॅलर्जीचा असतो. इन्फेक्शन झाल्यानंतरचा त्रास हा अत्यंत भयानक असतो. पावसाळ्यात काही जणांना दमा, त्वचेचे विकार, जुलाब यासारखे अनेक इन्फेक्शनच्या प्रकारांचा त्रास होतो. या दिवसांत दुषित पाण्याच्या वापरामुळे इन्फेक्शनवृद्धी होते. त्यासाठी स्वच्छ, निर्जंतुक पाण्याचा वापर करणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, घरगुती आहार घेणे, अवेळी जेवण टाळणे, त्वचेची काळजी घेणे, एवढे जरी आपण काळजीने केले तरी पावसाळ्यात कुठल्याही आजाराला बळी पडू शकणार नाही, याची खात्री नक्कीच आहे. मद्यसेवन :दारूच्या सेवनामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून मद्यसेवनाला विरोध क रूनही आज अनेकांचे बळी केवळ अती मद्यसेवनामुळे जातात. मद्यसेवनाची जास्त इच्छा पावसाळ्यातच होते. एकतर वातावरण थंड असते आणि मद्यपींना काय कारणच पुरेसे असते. नाही का? मात्र, मद्य हे पचायला जड असते. त्यामुळे भूक लागत नाही. अवेळी खाण्याने मग पोटात बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे मद्यसेवनही स्वत:ला पचेल, त्याचा काही त्रास होणार नाही अशापद्धतीनेच करावे. पावसाळ्यात मद्याचे सेवन हे एखाद्या विषाप्रमाणेच असते. डासांचा उपद्रव :पावसाळा म्हटला की, सर्वप्रथम आठवतात ते डेंग्यू, मलेरियाचे डास. तुम्ही कुठेही जा, कु ठेही बसलात तरी डासांचा त्रास तुम्हाला होणारच. सध्या असे अनेक मलम मार्केटमध्ये आले आहेत की, जे हातापायांना लावल्यास डास आपल्याला चावूच शकत नाहीत. त्यामुळे घरात डास होऊ नयेत असे वाटत असेल तर साचलेले पाणी ठेवू नका, पावसाचे पाणी एका ठिकाणी जमू देऊ नका. सातत्याने दुषित पाण्यावर किटकनाशकांची फवारणी करत रहा. या दिवसांत कुठल्याही खाद्यपदार्थांना बुरशी फार लवकरच लागते. त्यामुळे त्यावर बसलेल्या डासांचा प्रादुर्भाव अन्नपदार्थांनाही होऊ शकतो.घाण पाण्यापासून दूर रहा : पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि सांडपाणी हे एका ठिकाणी जमून त्यात डास, प्राणघातक प्राणी होण्याची शक्यता असते. आपल्या घरासमोर किंवा घरात घाण पाणी साचू देऊ नकात. ज्यामुळे कुठल्याच आजाराला निमंत्रण मिळणार नाही. स्वच्छ पाण्यात डास, माश्या यांची वृद्धी होत नाही पण, दुषित पाण्यात मात्र डासांची वाढ ताबडतोब होते. त्यामुळे घरातील अन्नपदार्थही झाकून ठेवत जा, जास्त दिवस साचलेले पाणी वापरू नका. पाणी उकळून प्या ही काळजी घेतल्यास तुम्हाला कुठल्याही आजाराला सामोरे जावे लागणार नाही.