शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केसांच्या सौंदयार्साठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 12:54 IST

स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या केशरचनेवर अवलंबून असते. उत्तम व योग्य केसांच्या ठेवणीमुळे त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. मात्र, बहुतांश महिलांना धकाकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या सुंदर केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही.

स्त्रियांचे सौंदर्य हे त्यांच्या केशरचनेवर अवलंबून असते. उत्तम व योग्य केसांच्या ठेवणीमुळे त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. मात्र, बहुतांश महिलांना धकाकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या सुंदर केसांची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. यामुळे केसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य आहार आणि केसांची योग्य देखरेख घेणे गरजेचे असते. केसांच्या सौंदयार्साठी केसांची काळजी कशी घ्यावी याबाबत काही टिप्स देत आहोत. * योग्य आहार- केसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी संतुलित आहार अत्यावश्यक असतो. भाजीपाला, बदाम, मासे, नारळ आदींचा आहारात समावेश असावा. यामुळे केस चांगले राहण्यास मदत होईल. * तेलाने मालिश करा- केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन इ. युक्त तेल महत्त्वाचे आहे. असे तेल केसांमध्ये सुमारे एक तास मुरले पाहिजेत, त्यामुळे तेल केसांच्या मुळापर्यंत जाण्यास मदत होते. कोणत्याही तेलाने केस वाढतात असे नाही, बदाम तेल केसांसाठी उपयुक्त आहे. शिवाय डोक्यावर कोमट तेलाने मालिश करावी आणि गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलने डोके झाकून घ्यावे. त्यामुळे केसांना वाफ मिळते. * केसांची स्वच्छता राखा- आपले केस लांब असतील तर आठवड्यातून दोन वेळा नक्की धुवावेत. कारण जसे केसांना तेल लावणे आवश्यक आहे, तशी केसांची स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची आहे. यामुळे केसांच्या मुळांना आॅक्सिजन मिळतो व केस सुंदर होतात. * केसांना बांधून ठेवणे- प्रवासादरम्यान केस बांधून ठेवावेत. कारण प्रदूषण, धूळ, माती आणि हवा याचा विपरित परिणाम आपल्या केसांवर होत असतो.