शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पावसाळ्यामध्ये केसांसाठी 'हे' मास्क वापरून तुम्हीही म्हणाल, हाय...ये रेशमी जुल्फे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 13:33 IST

पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा असतो. यामुळे आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. मान्सूनमध्ये अनेक महिला केस गळतीच्या समस्यांनी हैराण होतात.

पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा असतो. यामुळे आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवरही परिणाम होतो. मान्सूनमध्ये अनेक महिला केस गळतीच्या समस्यांनी हैराण होतात. त्याचप्रमाणे केस चिकट होण्यापासून केसांतील कोंड्याच्या समस्येनेही हैराण होतात. मग अशावेळी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा आधार घेतला जातो. पण याऐवजी काही घरगुती उपाय केसांच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून केसांसाठी हेल्दी ठरणारे हेअर मास्क तयार करू शकता. 

कोरफड आणि कडुलिंबाचा हेअर मास्क 

कोरफड 30 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील गर काढा आणि कडुलिंबाची पानं वाटून घेवून त्यामध्ये कोरफडीचा गर एकत्र करा. तयार मास्क केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसांना लावा. त्यानंतर माइल्ड शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ करा. यामुळे फक्त केसांचा चिकटपणा दूर कोणार नाही तर केसांच आरोग्य राखण्यासाठीही मदत होईल. 

खोबऱ्याचं तेल आणि दही 

अर्धा कप दह्यामध्ये पाच चमचे खोबऱ्याचं तेल एकत्र करा. त्यामध्ये पाच थेंब लिंबाचा रस एकत्र करा. तयार मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि अर्ध्या तासानंतर हेअर वॉश करून घ्या. तयार मास्क केसांची चमक वाढविण्यासाठी आणि केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. 

अवोकाडो आणि केळी 

अवोकाडोची साल काढून घ्या आणि त्यातील आतील भाग एखा बाउलमद्ये काढून घ्या. त्यामध्ये साल काढलेलं केळी स्मॅश करून घ्या आणि दोन चमचे मध एकत्र करा. व्यवस्थित एकत्र करून स्मूद पेस्ट तयार करा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने केसांच्या मुळाशी तयार पेस्ट लावा. तयार मास्कमुळे केसांच्या हेअर फॉलची समस्या रोखण्यासाठी मदत मिळते. एवढचं नाहीतर हे मास्क केसांच्या मजबुतीसाठीही फायदेशीर ठरतं. 

आवळा आणि कडुलिंब 

आवळा पाण्यामध्ये उकडून वाटून घ्या. यामध्ये कडुलिंबाची पानं वाटून एकत्र करा आणि स्मूद पेस्ट तयार करा. आता मास्क केसांवर लावा. 20 ते 30 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून जवळपास तीन वेळा हा पॅक केसांना लावा. हा मास्क केसांची चमक वाढविण्यासोबतच त्यांच्या मजबुतीसाठीही फायदेशीर ठरतो. टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीMonsoon Specialमानसून स्पेशलBeauty Tipsब्यूटी टिप्स