शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

आठवड्यातून किती वेळा शॅम्पू कराल? जाणून घ्या; शॅम्पूने केस धुण्याचे फायदे आणि नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 12:02 PM

सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण त्वचेची काळजी घेतात पण सौंदर्य खुलवण्यात त्वचेइतकाच महत्त्वाचा वाटा हा केसांचाही असतो. त्यामुळे त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे.

सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण त्वचेची काळजी घेतात पण सौंदर्य खुलवण्यात त्वचेइतकाच महत्त्वाचा वाटा हा केसांचाही असतो. त्यामुळे त्वचेसोबतच केसांचीही काळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. आजकाल लोकं त्वचेप्रमाणेच केसांसाठीही महागड्या ब्युटी ट्रिटमेंट फॉलो करताना दिसतात. केसांसाठी बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनी आमचा शॅम्पू केसांसाठी बेस्ट असल्याचा दावा करते. पण शॅम्पूमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स वापरले जातात. यांमुळे केसांना हळूहळू हानी पोहोचते. मग शॅम्पू वापरणं योग्य की नाही? किंवा आठवड्यातून किती वेळी शॅम्पू वापराचा? असे प्रश्न उपस्थित करण्यात येतात. जाणून घेऊयात शॅम्पू वापरणं केसांसाठी फायदेशीर आहे की नाही...

शॅम्पूचा वापर सतत करणं टाळा

केसांना शॅम्पू किती वेळा लावावा याबाबत एक्सपर्ट्सनी सांगितल्यानुसार, शॅम्पू केसांसाठी एका एम्‍लसिफायरप्रमाणे काम करतो. हे केसांवरील एक्स्ट्रा तेल, घाण आणि प्रदुषण स्वच्छ करण्यास मदत करतं. सामान्यतः आठवड्यातून 2 वेळा केसांना शॅम्पू करणं चांगलं असतं. परंतु, जर तुमचे केस प्रदुषणामुळे फारच घाण होत असतील तर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा शॅम्पूने केस धुवू शकता. दररोज शॅम्पू करणं योग्य आहे का? या गोष्टीबाबत एक्सपर्टचं म्हणणं आहे की, दररोज शॅम्पू केल्याने काही फायदे देखील होतात. त्याचप्रमाणे नुकसान देखील होतं.

दररोज केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर केल्याने होणाऱ्या नुकसानाबाबत...

- जास्त शॅम्पूचा वापर केल्याने केसांच्या मुळांपाशी किंवा स्काल्पला असलेले आवश्यक तेलही निघून जाते. 

- नॅचरल ऑइलच्या कमतरतेमुळे स्काल्पची त्वचा सुकून जाते आणि केसांच आरोग्य बिघडतं.

- केस गळण्याचे प्रमाण वाढते.

- शॅम्पूचा जास्त वापर केल्याने स्काल्पसोबत केसांमधील नॅचरल ऑईलही कमी होऊ लागतं. ज्यामुळे केसांची नॅचरल शाइन कमी होते. 

अशा केसांना रोज शॅम्पू केल्याने होतो फायदा :

-  ज्यांच्या केस फार ऑयली असतात त्यांना दररोज शॅम्पू केल्याने फायदा होतो. 

- ज्या लोकांच्या स्काल्पची त्वचा गरजेपेक्षा अधिक ऑयली आहे तेदेखील दररोज शॅम्पू करू शकतात. 

- जे लोक अधिक शारीरीक परिश्रमाची कामं करतात. तसेच कामासाठी दिवसबर बाहेर फिरतात त्यांना गरजेपेक्षा अधिक घाम येतो. अशा लोकांनीदेखील दररोज शॅम्पूने केस धुणं फायदेशीर ठरतं.

स्काल्पची त्वचा ऑयली आहे की नाही ते कसे ओळखाल ?

एक्सपर्टच्या मतानुसार, ज्या लोकांचा स्काल्पची त्वचाच ऑयली असते. त्यांनी दररोज किंवा एक दिवसाआड शॅम्पूने केस धुणं गरजेचं आहे. पण स्काल्प ऑयली आहे की नाही ते ओळखण्यासाठी सकाळी उठल्यावर केसांमध्ये हाताच्या बोटांनी मसाज करा. असे 4 ते 5 दिवस सतत केल्यानंतर जर दररोज बोटांवर तेल दिसू लागलं तर समजा की, तुमच्या स्काल्पची त्वचा ऑयली आहे.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स