शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
3
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
4
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
5
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वायपेयी? शहर सोडायचा आला विचार
6
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
7
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
8
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
9
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
10
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
11
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
12
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
13
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
14
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
15
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
16
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
17
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
18
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
19
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
20
आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही!

मॅसी हेअरस्टाइलने मिळवा हटके लूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 13:05 IST

जर आपण रेग्युलरच्या हेअरस्टाइलने बोअर झाले असाल आणि काहीतरी वेगळेपण हवे असेल तर मॅसी हेअरस्टाइलने हटके लूक देऊ शकता. मॅसी हेअरस्टाइले आपण खूप आत्मविश्वासी आणि बोल्ड दिसणार.

-Ravindra Moreजर आपण रेग्युलरच्या हेअरस्टाइलने बोअर झाले असाल आणि काहीतरी वेगळेपण हवे असेल तर मॅसी हेअरस्टाइलने हटके लूक देऊ शकता. मॅसी हेअरस्टाइले आपण खूप आत्मविश्वासी आणि बोल्ड दिसणार. कदाचित हा लूक आपण याअगोदर कधी ट्राय केला नसेल. मात्र विश्वास ठेवा की, ही स्टाइल वेगळीच असल्याने आपल्या व्यक्तिमत्त्वालाही उभारते. या नव्या लूकमध्ये आपण अगोदरपेक्षा नक्कीच वेगळ्या आणि सर्वांपेक्षा आकर्षक दिसणार. मात्र आपल्याला हेअरस्टाइलची निवड करताना आपल्या चेहऱ्याच्या आकाराचाही विचार करायला हवा. यासाठी मॅसी हेअरस्टाइल करण्याअगोदर चेहऱ्याचा आकार कसा आहे त्यानुसारच करा. सोबतच आपल्या प्रोफेशननुसारदेखील मॅसी हेअरस्टाइलची निवड करा. मॅसी हेअरस्टाइलचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे आपला चेहरा व प्रोफेशननुसारच ही हेअरस्टाइल करा. या हेअरस्टाइलचे वैैशिष्ट्य म्हणजे यात आपण खूपच कूल दिसता आणि स्वत:मध्ये आत्मविश्वास वाढ झाल्यासारखे वाटू लागते. कसा मिळवाल मॅसी लूक* मॅसी लूक बनविण्याअगोदर सर्वात अगोदर आपले केस चांगल्याप्रकारे वॉश करा. शॅम्पूसोबतच कंडीशनरचाही वापर करा. मात्र, जास्त कंडीशनरचा प्रयोग नको. असे केल्याने आपले केस फ्लॅट व सिल्की होतील आणि मॅसी लूक बनू शकणार नाही. *  केसांमध्ये फुलनेस आणण्यासाठी हेअर जेलचा प्रयोग करा आणि केसांना ब्लो ड्रायरच्या मदतीने ड्राय करा. असे केल्याने केस फुललेले वाटतील. * जर आपले केस कर्ली नसतील आणि आपण त्यांना कर्ली बनवू इच्छित नसाल तर केसांना क्रीपिंग आयरन करा, मात्र असे केसांच्या मुळापासून अंतर ठेऊन करा. केसांच्या मधोमधच करा. सोबतच केसांच्या फ्रंट हेअर लाइनवरदेखील असे करु नका.  * जर आपणास आपल्या केसांमध्ये जास्त कर्व्ह हवा असेल चेहऱ्याच्या चारही बाजूने थोडे केसं सोडा आणि सुमारे चार मिनिटापर्यंत केसांमध्ये मोठे हॉट रोलर्स लावा. * रोलर्सना थंड होण्याअगोदरच केसांमधून काढून घ्या. यानंतर डोक्याला मागील बाजूने झुकवा. त्यानंतर केसांवर तयार झालेल्या कर्लना एक-एक करुन वरती करा. असे स्क्रबिंग मोशनमध्ये करा. * आता आपल्या डोक्याला उजव्या बाजूला वर करा आणि बोटांचा वापर करून केसांना हळूहळू सेट करा. * हेअर क्रीम केसांच्या अग्रस्थानी लावा. असे केल्याने केस विखुरलेले वाटणार नाहीत. केसांना किती क्रीम लावायची हे केसांच्या टेक्श्चरवर अवलंबून असते. * जर आपले केस पातळ असतील तर आपल्या केसांना कमीतकमी क्रीमची गरज असेल. मात्र आपले केस कर्ली, रखरखीत आणि जाड असतील तर आपल्या केसांना जास्त हेअर क्रीम लागेल. जेव्हा केस सेट होतील त्यावेळी हेअर स्प्रे करा. * एकदा हेअरस्टाइल बनल्यानंतर पुन्हा-पुन्हा केसांवर बोटे नका फिरवू. आता आपला मॅसी हेअरस्टाइल तयार झाला. आता आपण आपल्या नव्या हेअरस्टाइलसोबतच एखादा कुल ड्रेस परिधान करा आणि बाहेर जा. नक्कीच आपल्याला मॅसी लूक एक आकर्षक लूक देईल आणि आपण खूपच सुंदर दिसणार.