शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

FASHION : ​‘नाइटविअर’ हवाय, मग स्टायलिश का नको?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 16:46 IST

नाइटविअरला ‘स्टायलिश’ लुक मिळत असून आज हा प्रकार कमालीच्या विविध अवतरांमध्ये दिसत आहे.

प्रसंग आणि आवश्यकतेनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्रप्रकार परिधान करीत असतो. त्यातीलच एक म्हणजे ‘नाइटविअर’ होय. हल्ली सर्व कपड्यांप्रकारेच नाइटविअरला ‘स्टायलिश’ लुक मिळत असून आज हा प्रकार कमालीच्या विविध अवतरांमध्ये दिसत आहे.  तसाच नाइटविअर म्हणजेच गाऊन वापरण्याची सुरुवात केवळ सोय आणि आवश्यकता म्हणून झाली असावी. दिवसभर कपड्याचे ओझे वागवून वैतागलेल्या जीवाला आणि शरीराला आराम मिळावा म्हणून हलका, सुटसुटीत असा झोपताना वापरायचा पोशाख म्हणजेच नाइटविअर होय. या नाइटविअरने आता स्टायलिशपणाची जागा घेतली असून त्याची अनेक रूपे दिसू लागली आहेत. त्यात  शमीस, नाइट ड्रेस कप्तान, गाऊन, मॅक्सी, रॅप सेट, टॉप-शॉर्टस सेट, बेबी डॉल अशी आढळून येत आहेत. शमीस हा साधारणत: सिंगल पीस असतो व लांबीला गुडघ्यांच्या थोडासा वर असतो. यातही आता टू-पीस किंवा रॅप असा आणखी एक प्रकार आला आहे.सध्या सेट म्हणजेच टी शर्ट-स्लीव्हलेस व पँट थ्री-फोर्थ असा ट्रेंड आहे. टीनएजर्ससाठी टॉप-शॉर्ट सेट विशेष करून आवडीचा होताना दिसतोय.रंग संगतीबद्दलही आजकाल प्रत्येकजण 'चुझी' होताना दिसत आहे. नाइटविअरही त्याला अपवाद नाही. पांढरा, क्रीम, लायलॅक, पिंक, रेड, ब्लॅक हे झाले क्लासिक्स तर नवीन रंगांमध्ये प्लम, परपल, हॉट पिंक, अ‍ॅक्वा म्हणजेच हॉट ब्ल्यू. पांढरा, गुलाबी, यलो, ब्राउन, टरक्वॉइज या रंगांना पसंती आहे.इतकेच नव्हे तर त्याची डिझाइन, वापरलेले मटेरिअल या गोष्टींकडे ही विशेषत्वाने लक्ष दिले जाते. ब्रायडल आणि डिझायनर नाइटविअरला सुद्धा खूप मागणी आहे यातही पॅटर्नस्बद्दल बोलायचे झाले, तर पायघोळ, हॉल्टर नेक, योक पिस, शेपली म्हणजेच जास्त घेर नसलेला, फुल, थ्री-फोर्थ हे आहेतच.शिवाय प्रिंटबद्दल काय विचारायचे. प्लेन, टेक्सचर्ड, एम्ब्रॉयडरी, लाइट आणि ब्राइट प्रिंटेड, अ‍ॅबस्ट्रॅक्ट प्रिंटेड हे आहेचत, पण क्लासिक म्हणावे असे हलकेफुलके फ्लोरल व पोल्का डॉट्स आपले वर्चस्व टिकवून आहे.नाइटविअर म्हणजे दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घय बनलेला आहे. त्यामुळे त्याची 'डिमांड' रंग लाई है. तो स्टायल स्टेटमेंट ठरत आहे. यातून आपण आपली निवड करावी व स्टाइल-स्टेटमेंट ठरवावे.