शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Fashion : ​साडी नेसा पण जरा हटके पद्धतीने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:04 IST

त्याच त्या पद्धतीने नेसली जाणारी साडी कंटाळवाणी वाटते, जाणून घ्या साडी नेसण्याच्या वेगळ्या पद्धती...

भारतीय नारीची खास ओळख म्हणजे तिची साडी होय. साडी जरी पारंपरिक असली तरी आज तिच्या नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींवरून स्त्रीयांना एक आकर्षक लूक मिळत असतो. सामान्य स्त्रीच नव्हे तर सेलिब्रिटीदेखील मोठ्या आवडीने साडी नेसताना दिसतात. विशेषत: साडी ही कॅज्युअल, फॉर्मल, पारंपरिक अशा कोणत्याही प्रसंगी नेसता येते. मात्र नेहमी त्याच त्या पद्धतीने नेसली जाणारी साडी कंटाळवाणी वाटते. याच सहावारीला जर वेगवेगळ्या पद्धतीने नेसण्याचे कौशल्य तुमच्याकडे असेल तर कोणत्याही प्रसंगी तुम्ही हटके दिसू शकता.* फुलपाखरु स्टाइलअशाप्रकारची साडी नेसायची असल्यास शिफॉन किंवा नेटच्या कापडाची साडी निवडा. यामध्ये पदर इतका बारीक केला जातो ज्यामुळे पोट व नाभी दिसते. याला बॉलिवूड स्टाइल असेही म्हटले जाते. * साडी गाऊन कॉकटेल पार्टीला जाण्यासाठी हे एक परफेक्ट आऊटफिट आहे. ही स्टाईल कम्फर्टेबल व मॉडर्न पद्धत आहे. ज्यांना साडी नेसता येत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात तुमचा पाय जरी निऱ्यावर पडला तरी या साडी गाऊनला काहीही होणार नाही. * जलपरी साडी जलपरी साडी नेसण्यासाठी जरदोसी किंवा हेवी वर्क केलेली भरदार पदराची साडी निवडा. ही पद्धत कोणत्याही प्रकारचा बांधा असलेल्या स्त्रियांवर ही साडी शोभून दिसते. या प्रकारच्या साडीमुळे तुम्ही बारीक दिसता. यामध्ये साडीचा खालचा भाग अशाप्रकारे गुंडाळलेला असतो की, ती साडी स्कर्टसारखी दिसते. या साडीला निऱ्या नसतात.* पॅन्ट स्टाइल साडीअधिक ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही पॅन्ट स्टाइलची साडी वापरू शकता. यासोबत तुम्ही जॅगिंग किंवा लेगिंग, क्रॉप टॉप किंवा चोळी व हील्स  वापरू शकता. साडीचा एक काठ घेऊन त्याच्या निऱ्या करा. या निऱ्या पॅन्टमध्ये खोचून दुसरा काठ ओढणीप्रमाणे खांद्यावरून घ्या. * नऊवारी साडी ही महाराष्ट्रीयन पद्धत आहे. इतर साडी नेसण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत वेगळी आहे. ही साडी लांब असते. यासाठी परकर घालायची गरज नसते. नऊवारी साडी नेसून त्यावर मोठी नथ व केसांचा अंबाडा बांधून त्याभोवती गुंडाळलेला गजरा. बस, सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे आपोआप आकर्षित होईल.* लहंगा साडी स्टाइललग्नसमारंभाच्या प्रसंगी मॉडर्न लूक मिळण्यासाठी हा ट्रेडिशनल पेहराव करु शकता. यासाठी घेरदार लहंगा किंवा स्कर्ट घालून त्यावर साजेशे ब्लाऊज घाला. यावर साध्या ओढणीऐवजी साडी घ्या. साडीच्या निऱ्या करून त्या मागच्या बाजूने कंबरेत मध्यभागी खोचा. उरलेला पदर ओढणीसारखा खांद्यावरून घ्या. Also Read : ​Fashion : ​दीपिका पादुकोनची या साड्यांना आहे खास पसंत !                   : ​Fashion Trend : ​‘साडी’..फॅशन जगतात अजूनही टिकलेले नाव...!