FASHION : कमी उंची असेल तर हे वापरणे टाळा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 17:17 IST
बहुतांश फॅशन शो मध्ये उंच लोक दिसतात. यामुळे मार्केटमध्ये उंच लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच कोणतेही फॅशन प्रॉडक्ट आणले जाते. अशात ठेंगण्या लोकांसाठी बाजारात काय आहे व काय घातल्यावर ठेंगणी व्यक्ती चांगली दिसेल हे ठरवणे कठीण होते.
FASHION : कमी उंची असेल तर हे वापरणे टाळा !
-Ravindra Moreफॅशन जगतात उंच व्यक्तींना वेगळे स्थान असते. कारण कुठलीही फॅशन उंच व्यक्तींवर उठावदार दिसते. म्हणून बहुतांश फॅशन शो मध्ये उंच लोक दिसतात. यामुळे मार्केटमध्ये उंच लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच कोणतेही फॅशन प्रॉडक्ट आणले जाते. अशात ठेंगण्या लोकांसाठी बाजारात काय आहे व काय घातल्यावर ठेंगणी व्यक्ती चांगली दिसेल हे ठरवणे कठीण होते. उंच मुलींनी काहीही घातले तरी त्यांना ते शोभून दिसते. परंतु ठेंगण्या मुलींना सगळेच कपडे शोभून दिसत नाही. आजच्या सदरात कमी उंचीच्या मुलींनी नेमकी कोणते कपडे वापरु नयेत जेणेकरुन त्या फॅशनेबल दिसतील याविषयी जाणून घेऊया.आडव्या प्रिंटचा ड्रेस - आडवी प्रिंट असलेले शर्ट, टॉप किंवा ड्रेस घालू नका. यामुळे तुम्ही अधिक ठेंगणे दिसाल. बरमूडा शॉर्ट्स - हे घातल्याने कमी उंची असेल तरीही तुम्ही खूप ठेंगण्या असल्याचे जाणवणार नाही. वाटल्यास तुम्ही मध्यम उंचीचे ट्राऊजरही घालू शकता.ओव्हर-साईझ बॅग्स - आपल्या उंचीला अनुसरून बॅगची लांबी निवडा. ओव्हर-साईझ बॅगमुळे तुम्ही खूप सुंदर दिसू शकता. वाईड लेग्ड पँट - अशा पॅन्ट मुळीच घालू नका. यामुळे उंची अधिक कमी दिसते. शर्ट ड्रेसेस - हे ड्रेसेस फार सुंदर दिसतात परंतु तुम्हाला ते शोभून दिसणार नाही. त्यामुळे शर्ट ड्रेस न घातलेला बरा.मिड-काफ-बूट - हे बूट दिसायला छान दिसतात. परंतु ते घातल्यावर उंची कमी वाटते. त्यामुळे ठेंगण्या मुलींनी हे घालू नये.