कुरमुरे, ब्रेड, कार्नचे अतिसेवन घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 15:41 IST
ग्लायसेमिक इंडेक्समध्ये समावेश असलेल्या पदार्थांच्या सेवनानेही कॅन्सरचा धोका वाढतो.
कुरमुरे, ब्रेड, कार्नचे अतिसेवन घातक
सकाळच्या नाश्तामध्ये अनेक जण कुरमुरे, ब्रेड, कॉर्न फ्लेक्स आणि ब्रेड आॅम्लेट खातात. पण खाण्याच्या या सवयीमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. व्हाईट ब्रेड, कॉर्न-फ्लेक्स आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. याशिवाय. ग्लायसेमिक इंडेक्समध्ये समावेश असलेल्या पदार्थांच्या सेवनानेही कॅन्सरचा धोका वाढतो. ग्लायसेमिक इंडेक्स एक अशी संख्या आहे जी विशेष प्रकारच्या पदार्थांशी संबंधित आहे. ग्लायसेमिक इंडेक्स एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील शर्करेच्या स्तरावर (ग्लूकोज) या पदार्थांचे परिणाम दर्शवतो. संशोधकांनुसार, या शोधासाठी फुफ्फुसाचा कॅन्सर झालेल्या 1905 रुग्णांवर संशोधन करण्यात आले.त्याचसोबत 2413 ठणठणीत लोकांवरही संशोधन करण्यात आले. यादरम्यान रुग्णांनी त्यांच्या मागील आहारामधील सवयींचे आणि प्रकृतीबाबतच्या इतिहासाची माहिती दिली. संशोधनादरम्यान दरदिवशी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाणाºयांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ न खाणाºयांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका 49 टक्के जास्त असल्याचे समोर आले.