शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

नेहमी तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

तरुण दिसणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणूनच तुम्ही सौंदर्यप्रसाधनाशिवाय काही साध्या उपायांनी तरुण कसे दिसला हे आपण जाणून घेऊया...

तारुण्य हे दर्शवते की आपण स्वत:ची कशाप्रकारे काळजी घेतली आहे आपण स्वत:ला कसं सांभाळत आहोत. टापटीप आणि व्यवस्थित राहणे हे सुद्धा तुम्हाला तारुण्याचा अनुभव देऊ शकते तसेच तारुण्याचा अनुभव तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करते.आपल्याला स्वत:बद्दल आदर वाटावा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण तरुण दिसणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणूनच तुम्ही सौंदर्यप्रसाधना शिवाय काही साध्या उपायांनी तरुण कसे दिसला हे आपण जाणून घेऊया...चेहऱ्याचेसौंदर्य हे चेहऱ्याच्या स्वच्छ आणि नीटनेटका दिसण्यात असते. त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आळस आणि कंटाळा न करता रोज वेळोवेळी चेहरा स्वच्छ धुणे. बाहेरून आल्यावर तुम्हांला सूट होणायºया फेसवॉशने किंवा उटणं याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा तरी चेहºयाला घरगुती फेसपॅक लावून मसाज करा.एक घटक जो तुम्ही तरुण दिसण्यात भर घालू शकतो ते म्हणजे तुमचे हसू , तुमचे हसणे हे तुम्हांला नेहमी सुंदर आणि तरुण ठेवते. त्यामुळे या हस्यासाठी तुम्हांला तुमच्या दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचे सुंदर मोत्यांसारखे दात तुम्हांला अजून तरुण बनवतील.चेहऱ्यावरचे अतिरिक्त केस, आयब्रो वेळच्यावेळी याची वेळच्या वेळी काळजी घ्या. तुमच्या चेहऱ्याच्या ठेवण असेल त्यानुसार आणि तुम्हांला सांभाळायला सोप्पे जातील अशी केशरचना करा. तुम्ही जर चेहऱ्यासाठी आणि त्वचेसाठी कोणत्याही प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरात असाल तर ते तुमची त्वचा स्वच्छ करताना तुमच्या चेहऱ्याचा आणि त्वचेचा नैसर्गीक थर आणि ओलसरपणा कमी करत तर नाही ना? याची खात्री करून घ्या. तुमची सौंदर्यप्रसाधने तुमची त्वचा रुक्ष आणि कोरडी तर बनवत नाही ना हे देखील पडताळून पहा. मॉस्चरायझरचा वापर करत असला तर तुमच्या त्वचेला सूट होणारं मॉस्चरायझर वापरा. खूप तेलकट नसणारे पण त्वचेतील ओलावा टिकवून ठेवणारे मॉस्चरायझर वापरा, उन्हात जाताना त्वचेची काळजी घ्या.तुम्ही घालत असणारे कपडे हे तुमचे व्यक्तिमत्व दर्शवत असतात. आणि तरुण दिसणे म्हणजे चालू फॅशनचे कपडे घालणे असं नाही तर त्याबरोबर तूम्हाला तुमच्या शरीराला कोणते कपडे आरामदायक वाटतात. फॅशन करताना देखील तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि तुम्हांला आरामदायक कपड्याची निवड करावी. प्रसन्न वाटणारे रंगाचे कपडे घालावे उगाच मळकट ढगळ कपडे घालू नये.तरुण दिसण्यासाठी एक महत्वाचं घटक म्हणजे संतुलित आहार. त्यासाठी तुम्हांला तुमच्या आहारात बदल करणे गरजेचे आहे. तुम्ही घेत असलेला आहार हा संतुलित सकस आहे ना? याची काळजी घ्या. संतुलित आहार म्हणजे तुम्ही तुमचे आवडते फास्ट फूड खाणे कायमचे बंद करा असे नाही. असते झाले तर उत्तम पण ते शक्य न झाल्यास त्याचे प्रमाण कमी करा. त्यासाठी पर्यायी आहार निवडा.तरुण आणि निरोगी राहण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. तुम्हांला झेपेल तुम्हांला आवडेल अशा प्रकारचा थोडातरी व्यायाम दिवसभरातून झालाच पाहिजे. योगा, जिम आधी पयार्यांचा वापर तुम्ही करू शकता.तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी रात्री ७-८ तास झोप झालीच पाहिजे. पुरेशा झोपेमुळे तुमचा थकवा कमी होईल. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न होईल आणि तुम्ही नेहमी ताजे-तवाने दिसाल. पुरेश्या झोपेचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत.तुम्हांला तरुण दिसण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी वरील काही सध्या टिप्स नक्कीच उपयुक्त ठरतील आणि मनाने तर तुम्ही तरुण आहातच..... आणि कायम असाल.Also Read : ​Beauty : चाळीशीनंतरही तरुण दिसण्यासाठी ‘या’ आहेत खास टिप्स !                     Beauty : ​फुल दाढी येण्यासाठी लिंबूचा असा करा वापर !