शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ड्राय स्कीनचा प्रॉब्लेम होतोय? करा हे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 11:41 IST

वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे अनेक आजारांसोबतच त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. अनेकदा आपण असं ऐकतो की, ड्राय स्कीनपेक्षा ऑयली स्कीनची कळजी घेणं फार कठीण असतं.

वातावरणातील वाढत्या प्रदुषणामुळे अनेक आजारांसोबतच त्वचेच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. अनेकदा आपण असं ऐकतो की, ड्राय स्कीनपेक्षा ऑयली स्कीनची कळजी घेणं फार कठीण असतं. असा विचार करणं ही आपली सर्वात मोठी चूक असते. ऑयली स्कीन इतकिचं ड्राय स्कीनचीही काळजी घेणं फार कठीण असतं. कारण ड्राय स्कीनचा प्रॉब्लेम फक्त हिवाळ्यातच नाही तर, उन्हाळा आणि पावसाळ्यातही होतो. पण जर तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये काही टिप्स फॉलो केल्या तर ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरतील. 

सकाळी उठल्यावर करा ही कामं

1. सकाळी उठल्यावर सर्वात आधी थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यावेळी साबण किंवा फेसवॉशचा वापर करू नका.

2. यानंतर चेहरा कोरडा करून चेहऱ्यावर मायश्चरायझर लावा. लक्षात ठेवा तुम्ही जे कोणतं मॉयश्चरायझरचा वापर करत असाल तर ते कमी केमिकल असलेलं असणं गरजेचं आहे. 

3. त्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावून घ्या. गुलाब पाण्याचाही तुम्ही टोनर म्हणून वापर करू शकता. 

4. थोड्या वेळानंतर चेहरा आणि शरीराच्या त्वचेवर सनस्क्रीन क्रिम लावा. घराबाहेर पडल्यानंतर स्कीनचा जो भाग थेट सुर्याच्या किरणांच्या संपर्कात येणार आहे. त्या ठिकाणी सनस्क्रीन क्रिम लावा. 

5. हे सर्व केल्यानंतर तुम्ही मेकअप करू शकता. परंतु, मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर सनस्क्रीन क्रिम लावणं गरजेचं आहे. 

दिवसा करा ही कामं

1. दिवसभरामध्ये कमीत कमी 2 तासांच्या अंतराने आपली बॉडी आणि चेहरा मायश्चराइज करा. त्यामुळे शुष्क त्वचेला वेळोवेळी हायड्रेट ठेवण्यास मदत होईल. 

2. चेहरा आणि शरीराच्या अन्य भागांशिवाय ओठांची पण काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे  एसपीएफ असलेल्या लिप बाम वापरा आणि दिवसामध्ये 2 ते 3 वेळा याचा वापर करा. 

3. अधिकाधिक पाणी प्या. फळं खा आणि व्हिटॅमिन-मिनरल्स असलेल्या पदार्थांचे सेवन करा. 

4. संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघताना मायश्चरायझर लावा. 

रात्री झोपण्यापूर्वी अशी घ्या त्वचेची काळजी

1. ड्राय स्किनच्या समस्येपासून सुटका करून घ्यायची असेल तर, रात्री स्कीनची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण रात्री स्कीनसाठी केलेला कोणताही उपाय फार परिणामकारक ठरतो. रात्री झोपताना चेहऱ्यावरील संपूर्ण मेकअप स्वच्छ करून झोपा. 

2. गुलाब पाणी किंवा टोनरच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. 

3. त्यानंतर एक चांगली नाईट क्रिम लावा. जी रात्री तुमच्या त्वचेला मायश्चराइझ करेल. 

टिप : वरील टिप्स व्यतिरिक्त आठवड्यामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी ड्राय स्कीनला सॉफ्ट आणि सिल्की बनवण्यासाठी घरच्या घरी फेस पॅक तयार करून त्याचा वापर करा. या फेसपॅकमुले फक्त ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी नाही तर नैसर्गिक उजाळा मिळवण्यासाठीही फायदा होईल. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स