ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 19:12 IST
धावपळीमुळे आजघडीला अनेकांचे ब्लड प्रेशर हे नियंत्रीत राहत नाही.
ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी...
या समस्यामुळे अनेकजण आजघडीला त्रस्त आहे. ते नियंत्रीत ठेवण्यासाठी औषधीचाही भडीमार सुरु राहतो. परंतु, तरीही ते नियंत्रणात राहत नाही. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधीपेक्षा असरदार गोष्टीची ही माहिती . दररोज घरच्या घरी त्याचा आपण जर सेवन केले तर निश्चीतच फरक जाणविल्याशिवाय राहणार नाही.हिरव्या शेंगा : दररोज हिरव्या शेंगा खाव्यात, त्यामध्ये मॅगनिशिअम व पोटेशिअमचा समावेश असतो. ते ब्लेड प्रेशरला नियंत्रीत ठेवते . दररोजच्या सेवनाने त्याचा आपल्याला फरक दिसून येईल.केळी : पोटेशिअमसाठी केळी हे खूप महत्वाचे फळ आहे. सकाळच्या नाश्तामध्ये एक केळी खाल्ली तर वाढणारे ब्लेड प्रेशर यामुळे नियंत्रीत राहते.दही : दही हे सुद्धा ब्लेड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी उपयोगाचे आहे. त्याकरिता दिवसातून एकदातरी दही हे सेवन केलेच पाहीजे.डार्क चॉकलेट : डॉक चॉकलेट खाण्यामुळेही ब्लड प्रेशर हे नियंत्रीत राहते. परंतु, दिलेल्या प्रमाणातच ते खावे. कारण की त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलोरी असतात. हे आॅस्टेलियाच्या एका संशोधनातून समोर आले आहे.