शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

​पुरुषांच्या लांब केसांसाठी बेस्ट हेअरस्टाइल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:19 IST

व्यक्तिमत्त्वाची छाप पाडताना आकर्षक हेअरस्टाइलची भूमिका महत्त्वाची असते. त्यातच महिलांच्या तुलनेने पुरुषांची हेअरस्टाईल कठीण असते. विशेष म्हणजे बहुतेक पुरुषांच्या केसांची लांबी कमीच असते, त्यामुळे त्यांना सेट करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात.

-Ravindra Moreव्यक्तिमत्त्वाची छाप पाडताना आकर्षक हेअरस्टाइलची भूमिका महत्त्वाची असते. त्यातच महिलांच्या तुलनेने पुरुषांची हेअरस्टाईल कठीण असते. विशेष म्हणजे बहुतेक पुरुषांच्या केसांची लांबी कमीच असते, त्यामुळे त्यांना सेट करण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. सेलिब्रिटींचे अनुकरण करुन बहुतांश पुरुष लांब केस ठेवण्याची फॅशन करताना दिसत आहेत. मात्र प्रत्येकालाच लांब केस ठेवणे आवडत नाही. कारण लांब केस असूनही योग्य हेअरस्टाइलच्या बाबतीत कनफ्यूजन असते. केसांना सेट करतेवेळी हे लक्षात घ्यायला हवे की, संबंधित हेअरस्टाइल आपल्या चेहऱ्याला सूट करीत आहे की नाही. आजच्या सदरात आपण पुरुषांच्या लांब केसांसाठी बेस्ट हेअरस्टाइल कशी करावी, याबाबत जाणून घेऊया...कोणत्या गोष्टींची घ्याल काळजीलांब केस आपल्या व्यक्तिमत्त्वाला सूट करतील की नाही, याचा विचार करुनच लांब केस ठेवण्याचा निश्चय करा. यासाठी आपण एखाद्या हेअर एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकतो. जर आपण एखाद्या विशेष इव्हेंटसाठी आपला लूक बदलू इच्छिता, तर त्यावेळी हेअर कटिंग करण्याची गरज नाही. आपण आपल्या केसांची सेटिंगदेखील करु शकता. जर आपणास कोट-पॅँट परिधान करणे जास्त आवडत असेल तर आपण आपल्या केसांना स्ट्रेट ठेवावे. यासाठी आपण केसांना जेल किंवा सीरम लावून केसांना सेट करु शकता.जर आपण हिवाळ्यात विशेषत: जीन्ससोबत ब्लेझर परिधान करीत असाल तर आपणास स्मोकी लूक खूपच सूट करेल. जीन्स आणि ब्लेजरसोबत स्मोकी हेअरस्टाइल खूपच आकर्षक वाटते. आपण कॉलेजला जात असाल आणि कॅज्युअल ड्रेस जास्त परिधान करीत असाल, तर आपण पोनीदेखील बनवू शकता. पुरुषांच्या लांब केसांमध्ये पोनी हेअरस्टाइल सहज बनविली जाऊ शकते. केसांना नवा लूक देण्यासाठी आपण कलरदेखील करु शकता. जर आपण थोड्याच दिवसांसाठी कलर ठेवू इच्छिता, तर असा कलर करा की जो लवकर लाइट होईल. जर आपण इंटरव्यूव्हसाठी कॅज्युअल ड्रेसमध्ये जात असाल तर सिंपल लूक आत्मसात करु शकता. इंटरव्यूव्हमध्ये सिंपल लूक आपणास खूप सूट करेल आणि आपल्या चेहऱ्यावर गांभीर्यदेखील दिसेल. सध्या फंकी लूक म्हणजेच अन इव्हन कटलादेखील तरुणाईची खूप पसंती मिळत आहे. जर आपण एखाद्या पार्टीमध्ये जात असाल तर फंकी लूकमध्ये जाऊ शकता. या लूकमध्ये आपणास केस जास्त सावरण्याची गरज नसते. जर आपले केस जास्तच लांब असतील तर त्यांना आपण मोकळेदेखील ठेऊ शकता. लांब केसांना मोकळे ठेवल्याने आपले व्यक्तिमत्त्व नक्कीच खुलून दिसेल. पुरुषांच्या लांब केसांसाठी वेवी हेअरस्टाइलदेखील आकर्षक दिसते. ही स्टाइल आपणास सर्वात वेगळी आणि कूल लूक देईल. बरेच हॉलिवूड स्टार आपल्या केसांची वेवी हेअरस्टाइलच ठेवतात. आपल्यासाठी कोणतीही हेअरस्टाइल सिलेक्ट करताना आपल्या चेहऱ्याचा आकार कसा आहे, याची काळजी घ्यावी आणि त्या आकाराला सूट करेल अशीच हेअरस्टाइल निवडावी, जेणेकरुन आपण इतरांपेक्षा हटके दिसाल.