शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी मोहरीच्या तेलाचे होतात 'हे' फायदे! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 11:26 IST

त्वचा, केसांसंबंधीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचे सौंदर्यांसंबंधी फायदे...

मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल आर्वजून वापरले जाते. आपली खाद्यसंस्कृती आरोग्यदायी असल्याने मोहरीचे तेल आरोग्यदायी आहेच. पण त्याचसोबत तुमच्या सौंदर्यातही याने भर घालण्यास मदत होते. यातील तत्त्वांमुळे त्वचा, शरीराचे पोषण होते. त्याचबरोबर त्वचा, केसांसंबंधितच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचे सौंदर्यांसंबंधी फायदे...

रॅशेसपासून सुटका

मोहरीच्या तेलाने रॅशेसपासून सुटका होते. यात अंटी फंगल आणि अंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर होण्यारे रॅशेस दूर होतात. यासाठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून त्वचेवर मसाज करा.

सन्सक्रीम

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण सन्सक्रीमचा वापर करतो. पण अनेकांना हे ठाऊक नाही की, सनबर्नच्या समस्येपासून वाचण्यासाठी मोहरीच्या तेलाशिवाय दुसरा परिणामकारक उपाय नाही. मोहरीच्या तेलात व्हिटॉमिन्स ई असल्याने सुर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. सुरकुत्यांवर परिणामकारक ठरते.

त्वचा उजळण्यासाठी

त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचा उजळेल.

केसांच्या आरोग्यासाठी

केस रुक्ष होणे, खाज, कोंडा यांसारख्या केसांच्या समस्येवर मोहरीचे तेल गुणकारी ठरते. आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करुन त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पूने धुवा. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल व केस चमकदार होतील. 

मोहरीच्या तेलाचे त्वचेला होणारे आणखी काही फायदे -

१) मोहरीच्या तेलाने चेहऱ्यावरील डाग सहज दूर होतात. 

२) मोहरीच्या तेलात असलेल्या ओमेगा ३ मुळे पिंपल्स दूर करण्यात मदत मिळते. 

३) मोहरीच्या तेलामध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए, ई आणि बी हे तत्व आढळतात. याचा वापर केल्याने त्वचेवर ग्लो येतो आणि त्वचा चमकदार होते. 

टिप : मोहरींच्या तेलाचा चेहऱ्यावर वापर करण्याआधी हातावर ते वापरुन बघा. जर तुमच्या त्वचेला ते सूट होत असेल तरच चेहऱ्यावर लावा. कारण काहींना याची अॅलर्जी असू शकते. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन याचा वापर करा.)  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स