Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 19:38 IST
आपणासही सेलिब्रिटीसारखी रुबाबदार दाढी हवीय, वापरा या टिप्स !
Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय !
-Ravindra Moreपुरुषांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी दाढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अगोदर बरेचजण तुळतूळीत दाढी ठेवायचे, त्यात आपण सुंदर दिसतो असे कित्येकांना वाटायचे. आता मात्र ट्रेंड बदलला आहे. रुबाबदार दिसण्यासाठी दाढीदेखील रुबाबदार पाहिजे असे बरेचजणांना वाटू लागले. त्यामुळेच पिळादर मिशांसोबत दाढी वाढवण्याची फॅशन आली आहे. विशेष म्हणजे दाढीमुळे तुमचे वय लपवायलाही मदत होते. शिवाय सनबर्न आणि चेहऱ्याच्या समस्या कमी होण्यासाठी मदत होते. मात्र बऱ्याचजांच्या वयासोबत दाढी वाढत नाही आणि अशा पुरुषांची इतरांसमोर कुचंबना होताना दिसते. पण आम्ही काही खास टिप्स देत आहोत ज्याद्वारे आपली दाढी रुबाबदार होऊ शकते. विशेष म्हणजे बरेच सेलिब्रिटी आपली दाढी रुबाबदार बनविण्यासाठी खालील टिप्स वापरतात. * आवळा तेल ज्यांना फुल दाढी येत नाही अशांनी आवळा तेलाचा वापर केल्यास फायदा नक्की होईल. कारण आवळा तेल चेहऱ्यावर केस उगण्यासाठी सर्वात परिणामकारक औषध आहे. यासाठी फक्त आवळ्याचे तेल किंवा मोहरीच्या तेलात मिसळवून लावू शकता. हे तेल लावल्यानंतर २० मिनिटांनी सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. याशिवाय मोहरीची पाने धुवून त्याची वाटून पेस्ट करून त्यामध्ये आवळ्याचे तेल घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि २० मिनिटानंतर धुवून टाका. आठवड्यात ४ वेळा केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला जाणवेल. * खोबऱ्याचे तेल खोबऱ्याच्या तेलातील गुणधर्मामुळे केसांची वाढ होण्यास खूप मदत होते. यासाठी खोबऱ्याचे तेल निलगिरीच्या तेलात १०:१ या प्रमाणात घ्या.कापसाच्या बोळ्याने या तेलाच्या मिश्रणाला चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटानंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेसंबंधीत समस्या कमी होतात आणि दाढीच्या वाढीस मदत होते. * निलगिरीचे तेल निलगिरीचे तेलही दाढीचे केस वाढण्यास मदत होते मात्र निलगिरीचे तेल चेहऱ्याला लावताना काळजी घ्या. यासाठी आॅलिव्ह तेलामध्ये १५ ते ३० थेंब निलगिरीचे तेल टाका. या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा आणि ३० मिनिटानंतर पाण्याने धुवून टाका. Also Read : Beauty : फुल दाढी येण्यासाठी लिंबूचा असा करा वापर ! Beauty : दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क !