शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Beauty : ​‘या’ वस्तूंचा वापर सौंदर्यासाठी घातकच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 18:14 IST

सौंदर्य खुलविण्यासाठी ज्याप्रमाणे काही पदार्थ खाणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे काही पदार्थ वर्ज्य करणेही आवश्यक आहे.

-Ravindra Moreआज प्रत्येकाला वाटते की, आपण सुंदर दिसावे. त्यासाठी विशेष काळजीदेखील घेतली जाते. मात्र बरेच प्रयत्न करुनही कित्येकांचे सौंदर्य अपेक्षित खुलत नाही. एका अभ्यासानुसार आहाराचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होत असतो. म्हणजेच आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. काही पदार्थांच्या सेवनाने सौंदर्य खुलण्यास मदत होते तर काही पदार्थांमुळे सौंदर्य धोक्यात येऊ शकते, ज्याप्रमाणे काही पदार्थ खाणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे काही पदार्थ वर्ज्य करणेही आवश्यक आहे. आज जाणून घेऊया की, कोणते पदार्थ सौंदर्याला बाधा ठरतात ते. * कॉफीचे सेवनबहुतांश जणांना कॉफी सेवन करण्याची सवय आहे. मात्र कॉफिच्या अतिसेवनाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. कॅफिन या उत्तेजक द्रव्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्वचेचा ताजेपणा निघून जातो. त्यामुळे त्वचा निस्तेच आणि कोरडी दिसू लागते. शिवाय दिवसभर कॉफी घेतल्याने डोकेदुखी, पित्ताचा त्रास होऊ शकतो. * मसाल्याचे पदार्थबऱ्याचजणांना मसाल्याचे पदार्थ युक्त भाजी खाण्याची सवय असते. मसाल्याच्या मिश्रणात दालचिनी असते. त्यातच मिरची पावडर आणि काळी मिरीची पावडर असते. या झणझणीत मसाल्याचा परिणाम आपल्या त्वचेची चमक आणि गुळगुळीतपणा कमी होऊ लागतो. शिवाय त्वचा सैलदेखील होते. * मीठ जास्त मीठ शरीरासाठी अपायकारकच म्हटले आहे. जास्त मिठाच्या सेवनाने ह्रदयाच्या समस्या निर्माण होतात तसेच रक्तदाबही वाढतो.  शिवाय मीठ त्वचेमधील कोलेजीन कमकुवत करते आणि त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात. * साखरअतिरिक्त साखरेच्या सेवनाने इन्शुलिनवरील ताण वाढतो. यामुळे म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसतात.Also Read : ​Beauty Tips : ​त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब तेल’ गुणकारी !                   ​Beauty : ​चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी..!