शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुलवा सौंदर्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

बहुतांश सेलेब्स आपले सौंदर्य आणि फिटनेस टिकविण्यासाठी स्टोन मसाज थेरपीचा वापर करतात, जाणून घ्या या थेरपीचे फायदे...!

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यात सेलिब्रिटी तर सुंदर दिसण्याला प्राधान्यक्रम देतात. त्यासाठी ते विविध सौंदर्य प्रसाधनांच्या वापराबरोबरच नाविण्यपूर्ण प्रयोगही करताना दिसतात. विशेषत: सौंदर्याच्या बाबतीत बरेच संशोधन होऊन काही थेरपींचा उगमही झाला आहे. म्हणजे सौंदर्य खुलविऱ्यासाठी आणि आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विविध थेरपींचा वापर वाढताना दिसत आहे. त्यातील एक थेरपी म्हणजे स्टोन मसाज थेरपी होय. बहुतांश सेलेब्स आपले सौंदर्य आणि फिटनेस टिकविण्यासाठी स्टोन मसाज थेरपीचा वापर करतात.* काय आहे स्टोन मसाज थेरपी?मेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन देखील आपल्या सौंदर्यात भर पाडता येते. स्टोन मसाज थेरपी ही अशी थेरपी आहे ज्यामध्ये नदीत आढळणाऱ्या दगडांचा वापर करुन मसाज केल्या जाते. त्वचेची कांती उजळण्यासोबतच विविध व्याधींवर उपचार म्हणूनही या थेरपीचा उपयोग केला जातो.हॉट स्टोन मसाज थेरपीमध्ये गुळगळीत दगड विशिष्ट तापमानावर गरम करुन शरीरावर विशिष्ट केंद्रस्थानी (जसे पाठ, हात इ.) ठेवले जातात. काही दगड हातात घेऊन थेरपिस्ट स्नायूंना मसाज करतात. चिल्ड स्टोन मसाजमध्ये गरम ऐवजी थंड दगड वापरले जातात. हे दगड सामान्यत: संगमरवरी असतात. चिल्ड मसाजसाठी बर्फाच्या लादीत दगड ठेवून थंड केले जातात.* या थेरपीचे फायदेया थेरपीमुळे दगडातील उष्णता शरीरात शोषून घेतली गेल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो. स्नायूंमध्ये आलेला ताठरपणा जाऊन ते लवचिक होतात. अवयवांमध्ये वेदना असतील तर त्या दूर करण्याचे काम या मसाजद्वारे केले जाते. दगडांमधील सौम्य उष्णतेमुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. खराब रक्ताभिसरणामुळे स्नायूतील ताण वाढून त्यात लॅक्टीक अ‍ॅसिडची निर्मिती व्हायला लागते.रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने स्नायूंना मुबलक प्राणवायू पुरवठा होतो ज्यामुळे वेदना किंवा दुखणे नाहीसे होते. ही थेरपी तज्ज्ञांकडूनच करुन घ्यावी. कारण दगडाची उष्णता किंवा मसाज करताना दाब देण्याचे प्रमाण यात चूक झाली तर दुखणे बरे होण्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असते.