शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

BEAUTY : चेहऱ्यावरील ‘तीळ’ सांगे बरेचकाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 14:56 IST

डाव्या डोळ्याखाली ज्या व्यक्तीला तीळ असतो, अशा लोकांचे वैवाहिक आयुष्य खूपच चांगले असते. अशा व्यक्तीचा पार्टनर त्याच्या या गुणामूळे खूपच आनंदी असतो.

-Ravindra Moreप्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर जन्मत: काहीना काही निशाण असते. मग तो जन्मडाग असू शकतो किंवा एखादा डाग असू शकतो. ही निशाण जन्मापासून मृत्युपर्यंत त्या व्यक्तीच्यासोबतच असते. जन्मापासून मिळालेल्या या निशाणाऐवजी आपल्या शरीरावर अजून एक वस्तू असते, आणि ती आपल्या व्यक्तित्त्वावर खूपच प्रभाव पाडते आणि आपल्याबाबत खूपच गुढदेखील उलगडते, ज्याला आपण ‘तीळ’ नावाने ओळखतो. शरीरावरील हा लहानसा काळा डाग सर्वांच्या शरीरावर कुठेना कुठे आहेच आणि हा काळा डाग शरीरावर विनाकारण नसतोच. मनुष्याच्या शरीरावर असणारा हा तीळ प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तित्त्वाच्या बाबतीत नक्कीच काहीतरी सांगत असतो. चला मग जाणून घेऊया की, चेहऱ्यावर आढळणारा तीळ काय सांगतो आपल्याबाबत... असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या भुवयांच्या मधोमध तीळ असेल तर तो व्यक्ती बुद्धिमान समजला जातो. अशा लोकांची स्मरणशक्ती खूप मजबूत असते आणि असे व्यक्ति आपल्या कौशल्याच्या जोरावर यश आणि धनसंपत्ती मिळवू शकतात.  ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याखाली तीळ असतो, असे लोक खूप भावनिक असतात. सोबतच यांच्या मनात ईर्षाची भावनाही त्वरित निर्माण होते. कारण असे लोक ज्याच्याकडून पराजित होतात, त्यांनो आपला शत्रू मानतात. ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो, असे लोक बौद्धिक स्तरावर इतरांपेक्षा खूपच पुढे असतात. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याजवळ नाकाच्या खाली तीळ असतो, असे व्यक्ति स्वभावाने खूपच गुढ असतात. त्यांना ओळखणे एवढे सोपे नसते. ज्या व्यक्तीच्या नाकाच्या अग्रस्थानी तीळ असतो, असे लोक खूपच रचनात्मक असतात आणि विशेष म्हणजे असे लोक आपले करिअर क्रिएटिव्ह क्षेत्रातच बनवितात. ज्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो, ते व्यक्ती स्वभावाने खूपच आत्मकेंद्रित असतात. आणि हाच स्वभाव त्यांच्यासाठी कधी कधी घातकही ठरतो. डाव्या डोळ्याखाली ज्या व्यक्तीला तीळ असतो, अशा लोकांचे वैवाहिक आयुष्य खूपच चांगले असते. अशा व्यक्तिचा पार्टनर त्याच्या या गुणामूळे खूपच आनंदी असतो.