Beauty : ‘या’ एका उपायाने टक्कल होईल दूर, येतील नवे केस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST
केस गळतीच्या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ऐन तारुण्यात डोक्यावर टक्कल दिसू लागते. जाणून घ्या कोणता आहे हा प्रभावी उपाय !
Beauty : ‘या’ एका उपायाने टक्कल होईल दूर, येतील नवे केस !
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची हेअरस्टाइल पाहून आज प्रत्येक तरुण त्याप्रकारची हेअरस्टाइल अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो, मात्र नेहमीच्या केस गळतीच्या समस्येने आपण अपेक्षित हेअरस्टाइल करु शकत नाही. केस गळतीच्या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ऐन तारुण्यात डोक्यावर टक्कल दिसू लागते. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही आपणास अशा एका उपायाची माहिती देत आहोत, जो फॉलो केल्यास टक्कल तर पडणारच नाही शिवाय नवीन केस येण्यास सुरुवात होऊ शकते. केस गळण्याचे प्रमाण जास्त असेल आणि टक्कल दिसू लागली असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळापर्यंत लावावा. यामुळे केस गळणे तर थांबतीलच शिवाय नवीन केस येण्यास सुरुवात होते. हा उपाय आठवड्यातून किमान तीन वेळा करावा. कांद्याच्या रसात सल्फर आणि मिनरल्स असतात. यामुळे केस वेगाने वाढतात आणि टक्कल कमी होते. केस गळतीशिवाय केसांत कोंडा असेल किंवा पांढरे केस असतील तरीही कांद्याचा रस लावल्यास फायदा होतो. यासाठी कांद्याला बारीक वाटून घ्या आणि त्यानंतर हाताच्या मुठीत घेऊन त्यातून रस काढा. हा रस केसांच्या मुळांना लावावा आणि अर्ध्यातासाने शॅँपूने केस स्वच्छ धुवावेत. केसांना लावण्यासाठी काढलेला रस जास्त काळापर्यंत साठवलेला नसावा. तसेच टक्कल कमी करण्यासाठीचे औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. * कांद्याच्या रसात मध मिक्स करु न लावल्यास केस गळतीच्या समस्येत अधिक फायदेशीर ठरते. * कांद्याच्या रसात आॅलिव्ह आॅईल मिक्स करुन लावल्यास केसांची चमक वाढते शिवाय केस काळे आणि मऊदेखील होतात. * कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिक्स करुन लावल्यास केस चमकदार होण्यास मदत होते. * कांद्याच्या रसात मेथी दाण्यांची पावडर मिक्स करुन लावल्यास केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. Also Read : Health : का २०-३० वयातच पुरुषांना सतावते केस गळतीची समस्या? : Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !