शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Beauty : दाट व आकर्षक पापण्यांसाठी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

आज प्रत्येक तरुणीला वाटते की आपले डोळेही सेलिब्रिटींसारखे आकर्षक असावे. त्यासाठी बहुतांश तरुणी मेकअपचा आधारही घेतात, मात्र हा आधार काहीअंशी तात्पुरता असतो.

आज प्रत्येक तरुणीला वाटते की आपले डोळेही सेलिब्रिटींसारखे आकर्षक असावे. त्यासाठी बहुतांश तरुणी मेकअपचा आधारही घेतात, मात्र हा आधार काहीअंशी तात्पुरता असतो. विशेष म्हणजे आपले डोळे आकर्षक दिसण्यासाठी पापण्या दाट असणे खूप आवश्यक असते. दाट पापण्यांमुळे डोळ्यांची आकर्षकता वाढते आणि यामुळे आपले सौंदर्य खुलण्यास मदत होते. जाणून घेऊ या आकर्षक व दाट पापण्यांसाठी काय कराल...चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी पापण्यांचे खूपच महत्त्व आहे. बऱ्याचजणांच्या पापण्या विरळ असतात, त्यामुळे त्यांच्या सौंदर्यावर परिणाम होतो. यासाठी ते मेकअपवर अधिक लक्ष देतात किंवा कृत्रिम पापण्या वापरतात. मात्र काही घरगुती उपाय केल्यास एवढा खटाटोप करण्याची आवश्यकता नाही.  * काय कराल घरगुती उपाय ?* दोन चमचे एरंडेलचे तेल घेऊन पाच मिनिट मंद आचेवर गरम करा. नंतर आच बंद करून तेल गार होऊ द्या. यात आढळणारे अँटीआॅक्सिडेंट रोम विकसित करण्यात मदत करतील आणि पापण्या दाट करतील. * व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. सुईने त्यात छिद्र करून जेल बाहेर काढा. एका चमच्यात घेऊन कस्टर आॅयलसोबत मिसळून घ्या. ही पेस्ट पापण्यांवर लावल्यास दाट होण्यास मदत होते. * कोरफडाचे पान घेऊन त्याचे जेल काढा आणि चमच्यात घेतलेल्या मिश्रणात फेटून घ्या. या मिश्रणात एक चमचा पेट्रोलियम जेली मिसळू शकतात. याने पापण्या गळत नाही आणि दाट होतात. ब्रशच्या मदतीने हे मास्क पापण्यांवर लावा. हे लावण्यापूर्वी आपल्याला पापण्या ब्रशने स्वच्छ कराव्या लागतील. हे मिश्रण आयब्रो वरही लावू शकता. हे मास्क रात्रभर असेच राहू द्या. सकाळी आपल्याला आपल्या आयब्रो आणि पापण्या नरम वाटतील. हवं असल्यास तीस सेकंद मास्क ने मसाज करू शकता. हे मास्क फ्रीजमध्ये ठेवू शकता. अप्लाय करण्याच्या काही वेळापूर्वी बाहेर काढावे. एक महिन्यापर्यंत वापरण्याने फरक कळून येईल. हे मास्क वापरताना इतर केमिकल वापरणे टाळावे. यासह प्रोटीन आणि व्हिटॅमिन आढळणाऱ्या आहाराचे सेवन करावे.