शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मसाल्यातील या गोष्टी वाढवू शकतात तुमचं सौंदर्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 14:39 IST

सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्ही हजारो रूपयांच्या क्रिमवर जो खर्च करता तो वाचू शकतो. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत.

विविध मसाले तुमच्या जेवणाची चव वाढवतात हे तुम्हाला माहिती आहेच. मात्र, काही मसाले असेही असतात जे तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासोबतच तुम्हाला सुंदरताही देऊ शकतात. तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असलेली हळद, दालचिनी, काळे मिरे, जीर, सोप सारख्या वस्तू तुमच्या सौंदर्यात भर घालू शकतात. यामुळे सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्ही हजारो रूपयांच्या क्रिमवर जो खर्च करता तो वाचू शकतो. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत.

१) हळद:

किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या हळदीचे आरोग्याला काय फायदे होतात  हे सर्वांनाच ठाऊक आहे. तुम्ही तुमच्या खाण्यात हळद वापरली तर त्यामुळे तुम्हाला चमकती त्वचा मिळू शकते. हळदीमध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे पिंपल्स, चेह-यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. एक ग्लास दूधात हळद टाकल्याने तुमचं रक्त स्वच्छ होतं. आणि रक्त स्वच्छ झालं की, आपोआप स्किन चांगली राहते. तसेच थोडीशी हळद बेसनात एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि ते स्किनवर लावाल्यास ग्लो येतो.

२) काळे मिरे:

काळे मिरे म्हटलं की, कुणाच्या चेह-यावरील हावभाव बदललेले बघायला मिळतात. कारण ते तिखट असतात. पण या काळ्या मिरेचे अनेक फायदे आहेत. काळे मिरे हे त्वचेवरील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात. काळे मि-याची भुकटी करून ते फेसपॅकमध्ये मिक्स करा आणि त्वचेवर स्क्रब करा. यामुळे चेह-यावरील घाण आणि मळ साफ होतो.

3. दालचीनी:

खाण्यात सुंगध यावा यासाठी आणि स्वाद येण्यासाठी दालचीनी वापरली जाते. या दालचीनीचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. दालचीनी वापर गरम मसाल्यात जास्त होतो. यात असलेले अ‍ॅंटी ऑक्सीडेंट, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स शरीरातील रक्ताचा प्रवाह व्यवस्थित ठेवतात आणि रक्तही शुद्ध करतात. यासोबतच यामुळे तुमचे केस चांगले आणि मजबूत राहतात. दालचीनी पावडरला फेसपॅकमध्ये एकत्र करून स्किनवर स्क्रब करू शकता.

४) बडीशेप :

जेवण झाल्यावर तोंडाला चव यावी यासाठी अनेकजण बडीशेप खातात. पण या बडीशेफेचे वेगवेगळे फायदे अनेकांना माहितच नाहीत. बडीशेपेच्या बीया त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आणि चेह-यावरील पिंपल्स नाहीसे करण्यासाठी फायद्याच्या आहेत. टोनरच्या रूपातही बडीशेपेचा वापर केला जाऊ शकतो. बडीशेपेच्या बियांना रंग बदलेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या. ते पाणी नंतर चेह-यावर लावा. हे पाणी तुम्ही प्यायल्यास पचनक्रिया चांगली होते.

५) जीरं

जी-याच्या बीया लहान असतात पण त्याचे फायदेही अनेक आहेत. यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. जि-यात असलेल्या अ‍ॅंटी ऑक्सीडेंट, इंजाइम्स, व्हिटॅमिन आणि खनिज त्वचेला हेल्दी ठेवतात. यामुळे त्वचा सुंदर आणि ताजीतवाणी दिसते.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स