शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

​आपणही डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त आहात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

पुरुषांच्या त्वचेच्या प्रकारानुसार पिंपल्स, काळे डाग आदी समस्या उद्भवू शकतात. वेळीच काळजी घेतली नाही तर ही समस्या बिकट होऊन चेहऱ्याची विद्रुपता वाढू शकते.

आज बहुतांश पुरुष आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहावे, यासाठी प्रयत्न करताना दिसतात. पुरुषांच्या त्वचेच्या प्रकारानुसार वातावरणाचा परिणाम किंवा अन्य काही कारणाने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यात पिंपल्स, काळे डाग आदी समस्या उद्भवू शकतात. वेळीच काळजी घेतली नाही तर ही समस्या बिकट होऊन चेहऱ्याची विद्रुपता वाढू शकते.  सौंदर्य आणि ते खुलविण्यासाठी मेकअप किंवा सौंदर्य सल्ला हे समिकरण मुलींसाठीच अधिक लागू होते. मात्र याचा अर्थ असा नाही की पुरुषांना याची गरजच नसते. पुरुषांच्या त्वचेलाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डोळ्याखालील काळे वर्तुळ यापैकीच एक समस्या आहे. पुरुष याकडे जास्त लक्ष देत नाही. यामुळे पुढे ही एक मोठी समस्या बनू शकते. जाणून घ्या का येतात हे काळे वर्तुळ आणि त्यावर उपाय काय?दिवसरात्र स्क्रीनसमोर बसल्याने, रात्री झोप बरोबर न झाल्याने, सिगारेट ओढल्याने डोळ्याखाली काळे वर्तुळ येतात. त्यासाठी दररोज दहा ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील हानिकारक टॉक्झिन्स बाहेर पडतील. फ्रीझरमध्ये रात्री एक चमचा बर्फ जमा व्हायला ठेवा. सकाळी उठून हा चमचा डोळ्याखाली लावा. त्यानंतर थोडे फेस क्रीम लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळून काळे वर्तुळ कमी होईल. जास्त उन्हात बाहेर पडू नका. निघायचे असल्यास सनस्क्रीन लावून सनग्लासेस लावून बाहेर पडा. डोळ्यावर बटाटा किंवा काकडीची चकती ठेवणे डोळ्यांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. वापरलेली टी बॅग किंवा हर्बल चहा डोळ्यांवर ठेवूनही डोळ्यांना आराम मिळतो. याव्यतिरिक्त दररोज आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.   Also Read : ​नेहमी तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही !                   : ​Beauty : चेहरा धुताना पुरुषांकडून होतात ‘या’ चुका !