कच्च्या पपईचे आश्चर्यकारक फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:28 IST
कच्ची पपई यकृतसाठी खूपच फायदेशीर असून यकृताला मजबूती देते. काविळीच्या आजारात यकृत खूप खराब होते. अशावेळी कच्ची पपई किंवा तिची भाजी करून खाल्ल्याने कावीळ आजारग्रस्तांना खूपच फायदा होतो.
कच्च्या पपईचे आश्चर्यकारक फायदे !
-Ravindra Moreकच्ची पपई यकृतसाठी खूपच फायदेशीर असून यकृताला मजबूती देते. काविळीच्या आजारात यकृत खूप खराब होते. अशावेळी कच्ची पपई किंवा तिची भाजी करून खाल्ल्याने कावीळ आजारग्रस्तांना खूपच फायदा होतो. कच्च्या पपईत आणि तिच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ‘ए’ आणि ‘ई’ आहे, ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. कच्ची पपई सर्दी आणि अॅलर्जीसोबतच संक्रमणापासूनही संरक्षण करते. याच्या सेवनाने मुत्रविकारांपासून आराम तर मिळतो. शिवाय बॅक्टेरियांचे प्रमाण कमी करते.शरीरावर नको असलेले केस विद्रुप वाटतात आणि त्यापासून सुटका मिळविणेदेखील कठीण असते. प्रत्येक महिन्यात त्यांना साफ करण्यासाठी वॅक्स किंवा शेविंग करणे अवघड होते. कच्च्या पपईने नको असलेले केस पुन्हा उगण्यास प्रतिबंध घातला जाऊ शकतो. कच्च्या पपईत एक शक्तिशाली एंजाइम असते, ज्याला पॅपिन म्हणतात. इंटरनॅशनल जर्नल आॅफ फार्मसुटिक्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार पॅपिन केसांच्या रोमला कमजोर करुन त्यांना पुन्हा वाढण्यास प्रतिबंध करते. आपल्याला नको असलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका करण्यास मदत करते. यासाठी बाजारात उपलब्ध अन्य क्रीम पेक्षा कच्ची पपई जास्त प्रभावी ठरते. पिकलेल्या पपईपेक्षा कच्च्या पपईत पॅपिनचे प्रमाण अधिक असते.Also Read : कच्ची पपई घालविते चेहऱ्यावरील डाग