शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियात व्हायरल होतोय #60secondrule; जाणून घ्या काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 15:37 IST

जर तुम्ही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला 60 सेकंदांच्या फेसवॉश रूलबाबत नक्की माहीत असेल. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर अनेक महिला हा 60 सेकंदांचा फेसवॉश रूल फॉलो करताना दिसत असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.

जर तुम्ही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला 60 सेकंदांच्या फेसवॉश रूलबाबत नक्की माहीत असेल. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर अनेक महिला हा 60 सेकंदांचा फेसवॉश रूल फॉलो करताना दिसत असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. स्किन केयर स्पेशलिस्ट LaBeautyologistने चेहरा स्वच्छ करण्याच्या पद्धतीचा एक व्हिडिओ #60secondrule या हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर केला केला होता. त्यानंतर जगभरातील अनेक महिला आणि तरूणी इम्प्रेस्ड झाल्या असून हा रूल अप्लाय करून आपले फोटो आणि व्हिडीओ हॅशटॅगसह सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. या रूलअंतर्गत तुम्हाला दिवसभरामध्ये 2 वेळा आणि 60 सेकंद म्हणजेच एक मिनिटासाठी आपला चेहरा व्यवस्थित स्वच्छ करायचा आहे. 

स्किन केयर टिप

1 मिनिटापर्यंत फेसवॉश करण्याचा हा ट्रेन्ड इंटरनेटवर व्हायरल होत असून लोक यामुळे झालेल्या ट्रांसफॉर्मेशनचे फोटो ऑनलाइन शेअर करत आहेत. न्यामका रॉबर्ट स्मिथ नावाच्या एका यूट्यूबरने आपला एक टूटोरियल व्हिडीओ शेअर केला होता. तिने सांगितले की, '60 सेकंदांचा हा फेसवॉश रूल एक नॉर्मल स्किन केयर टिप आहे. जो मी माझ्या सबस्क्रायबर्ससोबत शेअर केला होता. ज्यामुळे ते आपल्या महागड्या क्लिंन्जर्सचा पूर्णपणे उपयोग करू शकतील.' जेव्हा तुम्ही 60 सेकंदांपर्यंत आपल्या हाताच्या बोटांनी तुमचा चेहरा स्वच्छ करता त्यावेळी क्लिंजरमध्ये असलेले इन्ग्रीडियंट्स व्यवस्थित त्वचेमध्ये मुरतात. 60 सेकंद रूलमुळे तुमची स्किन मुलायम होते आणि ब्लॉकेज ओपन होतात. तसेच स्किनचा टेक्सचर आणि इव्हननेस उत्तम होतं. 

मॅक्सिमम स्किन बेनिफिट्स

जर तुम्हाला तुमच्या फेसवॉशने मॅक्सिमम स्किन बेनिफिट्स मिळवायचे असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर ब्रेकआउट नको असतील तर सकाळी आणि रात्री असं, दिवसातून 2 वेळा 60 सेकंदांसाठी फेसवॉश रूल फॉलो करा. त्याचबरोबर तुम्हाला या गोष्टीचीही काळजी घेणं गरजेचं आहे की, तुम्ही ज्या क्लिंजरचा वापर करत आहात, त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये एखाद्या प्रकारचं इरिटेशन होणार नाही. त्याचबरोबर फेसवॉशने चेहरा स्वच्छ करताना डोळ्यांच्या आजूबाजूलाही हलक्या हाताने मसाज करणं आवश्यक आहे. 

स्किनवर व्यवस्थित मसाज करा

ब्युटी एक्सपर्ट्सच्या मते, जेव्हा तुम्ही क्लिंजर किंवा फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करता त्यावेळी चेहऱ्यावर व्सवस्थित मसाज करणं आवश्यक आहे. कारण चेहऱ्यावर असलेलं मेकअप, घाण, प्रदूषण इत्यादी हटवण्यासाठी थोडा वेळ देण्याची गरज असते. त्याचबरोबर नाकाच्या आजूबाजूच्या भागामध्ये, हेयरलाइन असणारा भाग व्यवस्थित स्वच्छ करणं आवश्यक असतं. कारण जास्तीत जास्त लोक फक्त गाल आणि चेहरा स्वच्छ करतात. परंतु अनेक भाग व्यवस्थित स्वच्छ करणं विसरून जातात. 

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूबViral Photosव्हायरल फोटोज्