शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

विश्व बॅडमिंटन :प्रणय, समीर दुसऱ्या फेरीत; दुहेरी आणि मिश्र प्रकारातही भारतीयांचे विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 04:43 IST

एच. एस. प्रणय आणि समीर वर्मा यांनी सरळ गेममध्ये विजय नोंदवित सोमवारी बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपची दुसरी फेरी गाठली.

नानजिंग (चीन) : एच. एस. प्रणय आणि समीर वर्मा यांनी सरळ गेममध्ये विजय नोंदवित सोमवारी बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपची दुसरी फेरी गाठली.विश्व क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या प्रणयने न्यूझीलंडचा अभिनव मनोटा याच्यावर २१-१२, २१-११ ने विजय नोंदवित शानदार सुरुवात केली, तर समीरने फ्रान्सचा लुकास कोर्वी याच्यावर २१-१३, २१-१० अशा फरकाने विजय नोंदविला. यंदा आशियाई स्पर्धेचे कांस्य जिंकणाºया प्रणयला दुसºया फेरीत ब्राझीलचा यगोर कोल्हो याच्याविरुद्ध; तसेच स्विस ओपनचा विजेता समीरला चीनचा दिग्गज दोनवेळेचा आॅलिम्पिक सुवर्णविजेता लिन डॅन याच्याविरुद्ध खेळायचे आहे.विश्व क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेले सात्त्विक साईराज रंकी रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांच्या मिश्र जोडीने डेन्मार्कचे निकलास नोर आणि सारा त्यागसेन यांचा २१-९, २२-२० ने पराभव केला.भारताची अव्वल मानांकित मिश्र जोडी प्रणव जेरी चोप्रा-एन.सिक्की रेड्डी यांनीही शानदारसुरुवात केली. २२ व्या स्थानावरील या जोडीने झेक प्रजासत्ताकचे जाकूब बिटमॅन-अल्जेबेटा- बाहोवा यांच्यावर २१-१७, २१-१५ ने विजयाची नोंद केली.संयोगीता घोरपडे-प्राजक्ता सावंत यांच्या महिला दुहेरी जोडीला मात्र तुर्कस्थानची जोडी बेंगिसू इन्सेंटिन-नाजकिलान इन्सी यांच्याकडून २०-२२, १४-२१ ने पराभवाचा धक्का बसला. (वृत्तसंस्था)मनू अत्री-बी. सुमीतरेड्डी यांची आगेकूचपुरुष दुहेरीत मनू अत्री-बी. सुमीतरेड्डी यांच्या जोडीने बल्गेरियाचे डॅनियल निकोलोव- इवान रूसेव यांचा २१-१३, २१-१८ ने पराभव केला.सौरभ शर्मा-अनुष्का पारिख; तसेच रोहन कपूर- कुहू गर्ग यायुवा मिश्र जोडीनेदेखील दमदार विजय नोंदवून दुसºया फेरीत धडक दिली.सौरभ-अनुष्का यांनी नायजेरियाचे इंजोह अबाह- पीस ओर्जी यांच्यावर २१-१३,२१-१२ ने आणि रोहन-कुहू यांनी कॅनडाचे टोबी एनजी- राचेल हेंड्रिच यांचा २१-१९,२१-६ ने पराभव केला.

टॅग्स :BadmintonBadminton