शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विश्व बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांत, प्रणीत उपउपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 03:52 IST

स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीत विजय नोंदवून बुधवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

नानजिंग (चीन) : स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी विपरीत परिस्थितीत विजय नोंदवून बुधवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. विश्व क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेला एच. एस. प्रणय याला ब्राझीलचा इगोर कोल्हो याच्याकडून पराभवाचा धक्का बसला. बी. साईप्रणित हा मात्र पुढील फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.आॅलिम्पिक रौप्य विजेत्या सिंधूने इंडोनेशियाची फितरियानी हिच्यावर २१-१४,२१-९ ने सहज विजय नोंदविला. मागच्या वर्षी रौप्य जिंकणाऱ्या २३ वर्षाच्या सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली होती. पुढील फेरीत ती २०१५ च्या विश्व स्पर्धेची कांस्य विजेती कोरियाची सुंग जी ह्यून हिच्याविरुद्ध खेळणार आहे.पाचवा मानांकित श्रीकांतने स्पेनचा पाबलो एबियन याच्यावर तीन गेमपर्यंत लांबलेल्या सामन्यात २१-१५,१२-२१,२१-१४ अशा फरकाने विजय नोंदविला. मागच्या वर्षी चार जेतेपदाचा मानकरी ठरलेल्या श्रीकांतची आता मलेशियाचा डेरेन ल्यू याच्याविरुद्ध लढत होईल. ल्यूने २०१२ मध्ये फ्रेंच ओपन सुपर सिरिज जिंकली होती.बी. साईप्रणित याने स्पेनचा लुई एन्रिक पेनालवर याला २१-१८,२१-११ ने पराभूत केले. प्रणीतला पुढील सामन्यात डेन्मार्कच्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध दोन हात करायचे आहेत. प्रणयने चांगली सुरुवात केली धरी पण मधल्या टप्प्यात लय गमविल्याने विश्व क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेल्या कोल्होकडून २१-८,१६-२१,१५-२१ ने पराभवाचा धक्का बसला.भारताच्या दुहेरीतील खेळाडूंसाठी आजचा दिवस वाईट ठरला. सर्व भारतीय पराभूत झाले. राष्टÑकुलचा रौप्य विजेता सात्त्विक साईराज- चिराग शेट्टी यांना डेन्मार्कचे किम एस्टुप- अ‍ँडर्स रासमुसन यांच्याकडून १८-२१,२१-१५,१६-२१ ने पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton