शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप - सिंधूचं 'सुवर्ण'स्वप्न भंगलं, रौप्य पदकावर समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 00:38 IST

रिओ ऑॅलिम्पिक रौप्य विजेत्या स्टार पी. व्ही. सिंधूचे ग्लासगो शहरात सुरु असलेल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वर्न भंगले

ग्लास्गो, दि. 27 -  रिओ ऑॅलिम्पिक रौप्य विजेत्या स्टार पी. व्ही. सिंधूचे ग्लासगो शहरात सुरु असलेल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वर्न भंगले.  अटीतटीच्या लढतीत जपानच्या नोजोमी ओकुहाराने सिंधूचा 2-1 ने पराभव केला. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानवे लागले. 

चुरशीच्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहाराने सिंधूचा पराभव केला. त्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ग्लासगोत सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओकुहारा हिने सिंधूवर २१-१९, २०-२२, २२-२० असा विजय मिळवला आहे. सिंधूच्या दमदार सुरुवातीनंतरदेखील नोजोमीने अटीतटीची लढत देत पहिला गेम जिंकला. जपानच्या नोजोमी ओकुहाराने पहिला गेम १९-२१ असा जिंकला. दुस-या गेममध्ये सिंधूने नोजोमीवर वर्चस्व गाजवत विजय मिळवला. मात्र अंतिम गेममध्ये सिंधूला पुन्हा एकदा नोजोमीकडून २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. नोजोमी ओकुहारा हिने शनिवारी सायना नेहवाल हिचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. हिमांता बिस्वा शर्मा यांनी सिंधूला १०, तर सायनाला रोख ५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.  जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधूचे अभिनंदन करीत म्हणाले, ‘तू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहेस. देशाला तुझ्यावर गर्व आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे.’

दरम्यान, 2013 आणि 2014 मध्ये कांस्य पदक जिंकणा-या 22 वर्षांच्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफेईवर 48 मिनिटांत  21-13, 21-10  अशा फरकाने विजय मिळवला. तर, उपात्यंपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूने  विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनच्याच सून यू हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवित कास्य पदक निश्चित केले होते. यावेळी सून यू हिच्यावर 39 मिनिटांत 21-14, 21-9 अशी मात करत पी.व्ही. सिंधूने उपांत्य फेरी गाठली होती.

नोजोमी ओकुहारा हिने शनिवारी भारताची फुलराणी आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सायना नेहवाल हिला विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी नोजोमीने 12-21, 21-17, 21-10 अशा सरळ सेटमध्ये सायना नेहवालचा पराभव केला.