शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Thailand Open Badminton : सिंधूला जेतेपद पटकावण्यात अपयश, सहा वर्षांनंतरही भारताची पाटी कोरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 19:23 IST

जपानची नोझोमी ओकुहारा आणि भारताची पी. व्ही. सिंधू  यांच्यातील थायलंड ओपन वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम लढत तंदुरूस्तीचा कस पाहणारी ठरली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ओकुहाराने यात वर्चस्व राखताना 21-15, 21-18 असा विजय मिळवत जेतेपद नावावर केले.

बँकॉक - जपानची नोझोमी ओकुहारा आणि भारताची पी. व्ही. सिंधू  यांच्यातील थायलंड ओपन वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम लढत तंदुरूस्तीचा कस पाहणारी ठरली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ओकुहाराने यात वर्चस्व राखताना 21-15, 21-18 असा विजय मिळवत जेतेपद नावावर केले. 2012 मध्ये भारताच्या सायना नेहवालने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर या स्पर्धेतील महिला एकेरीतील भारताची जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. जय-पराजयाच्या शर्यतीत 5-5 असे समसमान असलेल्या ओकुहारा आणि सिंधू यांच्यातील पहिला गेम ओकुहाराने जिंकला. 2-2 अशा बरोबरीनंतर ओकुहाराने आक्रमक खेळाला सुरूवात केली. तिने नेट जवळील खेळ करताना 6-2 अशी आघाडी घेतली. सिंधूने जोरकस स्मॅश लगावत ही पिछाडी 5-6 अशी कमी केली, परंतु ओकुहाराने सातत्याने  आक्रमक पवित्रा घेत आघाडी कायम राखली. 17-15 अशा आघाडीनंतर ओकुहाराने सिंधूला एकही गुण घेऊ दिला नाही आणि तिने हा गेम 21-15 असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. सिंधूने दुस-या गेममध्ये स्मॅश आणि लांब फटके मारताना 6-2 अशी आघाडी घेतली. ओकुहारानेही स्मॅशचा सुरेख खेळ करताना गेममध्ये कमबॅक केले. सहाव्या गुणासाठी 36 फटक्यांची रॅली झाली आणि त्यात ओकुहाराने बाजी मारताना गेम 6-6 असा बरोबरीत आणला. दोन्ही खेळाडूंनी कोर्टला व्यापून टाकणारा खेळ केला. सिंधूने तिरप्या फटक्यांवर, तर ओकुहाराने नेट जवळील खेळावर भर दिला. ओकुहारा सामना जिंकण्यासाठी, तर सिंधू आव्हान वाचवण्यासाठी चतुरस्र खेळ करत होती. त्यामुळे एकेका गुणासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळाली. ओकुहाराने टोलावलेला शटल रेषेबाहेर जात असल्याचे समजून सिंधू वारंवार त्याला प्रत्यूत्तर देण्यास टाळत होती आणि तिचे बहुतांश अंदाज चुकल्याने ओकुहाराला फायदा झाला. हा गेम 9-11 अशा पिछाडीवरून ओकुहाराने 15-14 अशा आघाडीसह चुरशीचा केला. ओकुहाराने स्मॅश लगावताना सिंधूच्या शरीरावर परतीची फटका ठेवण्याचा खेळ केला. सिंधूने 14-17 अशा पिछाडीवरून समाना 16-17 असा आणला, ओकुहाराने सुरेख खेळ केला. गेम 18-16 अशा ओकुहाराच्या पारड्यात असताना दोघींमध्ये लाँगेस्ट रॅलीचा खेळ झाला. त्यात सिंधूने वर्चस्व गाजवले. ओकुहाराने 20-18 अशा आघाडीसह मॅच पॉईंट घेतला आणि 21-18 अशा फरकाने हाही गेम जिंकला. 

 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonSportsक्रीडा