शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांतने जिंकली डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 22:16 IST

भारताचा आघाडीचा बॅडंमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

ओडेन्से - भारताचा आघाडीचा बॅडंमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने डेन्मार्क ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत श्रीकांतने कोरियाच्या ली ह्युन याच्यावर 21-10, 21-5 अशी सरळ गेममध्ये मात केली. श्रीकांतचे हे तिसरे सुपर सीरिज विजेतेपद आहे. डेन्मार्क ओपनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीवर भारताच्या श्रीकांतने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. अवघी 25 मिनिटे चाललेल्या लढतीत श्रीकांतच्या आक्रमणासमोर दक्षिण कोरियाचा ली ह्युन पूर्णपणे निष्रभ ठरला. आक्रमक सुरुवात करणाऱ्या श्रीकांतने पहिला गेम 21-10 अशा मोठ्या फरकाने जिंकत अंतिम लढतीत आघाडी घेतली. त्यानंतर श्रीकांतने आपल्या खेळातील आक्रमकता अधिक वाढवत दुसरा गेमही 21-5 अशा मोठ्या फरकाने जिंकला आणि स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.  तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्य लढतीत  श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ ने पराभव करीत डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनला पराभवाचा धक्का देणा-या श्रीकांतने शनिवारी उपांत्य लढतीतही कामगिरीत सातत्य राखले. पहिल्या गेममध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर श्रीकांतने दुस-या गेममध्येही लय कायम राखत विजय साकारला.  

टॅग्स :BadmintonBadminton