शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत, प्रणॉय यांनी पर्यायी योजनांवर काम करावे - विमल कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 04:55 IST

किदाम्बी श्रीकांत आणि एस.एस. प्रणय यांना आगामी आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी विशेषत: दबावात असताना पर्यायी योजनांवर काम करायला हवे

नवी दिल्ली : किदाम्बी श्रीकांत आणि एस.एस. प्रणय यांना आगामी आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी विशेषत: दबावात असताना पर्यायी योजनांवर काम करायला हवे, असे मत भारतीय बॅडमिंटन संघाचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले.श्रीकांत विश्व चॅम्पियनशिपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या अनुभवी डॅरेन लियूविरुद्ध पराभूत झाला होता तर प्रणयला ब्राझीलच्या विशेष ओळख नसलेल्या इगोर कोल्होविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.विमल कुमार म्हणाले,‘मी श्रीकांत व प्रणय यांच्याकडून निराश आहे. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य आणावे लागेल. त्यांची एक योजना अपयशी ठरली तर त्यांनी पर्यायी योजना ठेवायला हवी. त्यात ते अपयशी ठरले आहेत. ते आक्रमक खेळाडू असून परिस्थिती जर अनुकूल नसेल ते प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान पेलण्यास अपयशी ठरतात. त्यावर त्यांना मेहनत घ्यावी लागेल.’विश्व चॅम्पियनशिपमध्ये ली चोंग वेईच्या अनुपस्थितीचा श्रीकांतला लाभ घेता आला नाही, त्यामुळे विमल कुमार अधिक निराश झाले. ते म्हणाले,‘श्रीकांतला ली चोंगच्या अनुपस्थितीचा लाभ घ्यायला हवा होता. कधी-कधी तुम्ही दिग्गज खेळाडूवर वर्चस्व गाजवू शकता, पण लियू हा प्रणय किंवा श्रीकांतच्या दर्जाचा खेळाडू नाही. श्रीकांतसाठी हा चांगला निकाल नव्हता.’ विमल कुमार पुढे म्हणाले,‘अशियाई स्पर्धेत काहीही घडू शकते. आघाडीच्या खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. मोमोटाचा अपवाद वगळता कुणीच कामगिरीत सातत्य राखलेले नाही.’ (वृत्तसंस्था)विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. आॅलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मरिनने नमविले होते.सिंधूच्या कामगिरीविषयी विमल यांनी वक्तव्य केले की, ‘आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सिंधूला या पराभवातून लवकर सावरावे लागेल. या स्पर्धेत सिंधू भारतासाठी पदक पटकावण्यास प्रबळ दावेदार आहे.’ 

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा