शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू, श्रीकांतचे जेतेपदाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 01:03 IST

भारताचे अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे इंडोनेशिया ओपनमधील शानदार कामगिरी कायम ठेवताना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याकडे लक्ष असणार आहे.

बँकॉक  - भारताचे अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे इंडोनेशिया ओपनमधील शानदार कामगिरी कायम ठेवताना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकण्याकडे लक्ष असणार आहे. सिंधू आणि श्रीकांत गत सत्रात सुरेख लयीत होते आणि अनेक स्पर्धा जिंकण्यात ते यशस्वी ठरले होते; परंतु या हंगामात सातत्यपूर्वक कामगिरीनंतरही या दोघांनाही मोठी स्पर्धा जिंकता आली नाही.सिंधू इंडिया ओपन आणि राष्ट्रकुल स्पर्धेत उपविजेती ठरली होती, तर श्रीकांतने गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. संमिश्र सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले होते. बीडब्ल्यूएफ विश्व टूरच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या पहिल्या टप्प्यातील दोन स्पर्धेत लय मिळाल्यानंतरही भारतीय खेळाडू विजेतेपद पटकावू शकले नाहीत. सिंधू दोन आठवड्यात अनुक्रमे उपांत्य फेरी आणि उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरली, तर या दोन्ही स्पर्धेत श्रीकांतचे आव्हान जपानच्या केंतो मोमोता याने अनुक्रमे उपांत्य फेरी व पहिल्या फेरीत संपुष्टात आणले. सिंधू या आठवड्यात बुल्गारियाच्या लिंडा जेटचिरिविरुद्ध या स्पर्धेत प्रारंभ करील तर पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना क्वॉलीफायर खेळाडूविरुद्ध होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कारकीर्दीतील दुसरे सुवर्णपदक जिंकणारी सायना नेहवाल थायलंडच्या बुसनान ओंगबुरूंगपान हिच्याविरुद्ध पहिल्या फेरीत खेळेल. स्वीस ओपनचा विजेता समीर वर्मादेखील स्पर्धेत आपला ठसा उमटविण्यास सज्जा आहे. (वृत्तसंस्था)जयरामला उपविजेतेपदगाचिन (रशिया) : दुखापतीनंतर पुनरागमन करणारा अजय जयराम याला व्हाईट नाईट्स इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तो अंतिम फेरीत स्पेनचा अव्वल मानांकित पाब्लो आबियानविरुद्ध पराभूत झाला. जयरामला पाब्लोविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतरही ५५ मिनिटे रंगलेल्या या लढतीत २१-११, १६-२१, १७-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, तरूण कोना आणि सौरभ शर्मा या पुरुष दुहेरीच्या जोडीला उपांत्य फेरीत जर्मनीच्या बार्ने गेइस - यान कोलिन वाल्कर या जोडीविरुद्ध २१-१८, १३-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा