नवी दिल्ली : स्टार पी.व्ही. सिंधूने गुरुवारी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफ ताज्या विश्व क्रमवारीत पुन्हा एकदा दुसरे स्थान पटकावले.सिंधूने एका स्थानाने प्रगती करुन चिनी तैपईच्या ताय ज्यू यिंगनंतर दुसरे स्थान पटकावले. सिंधू गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रथमच दुसºया क्रमांकावर पोहोचली होती, पण त्यानंतर तिची घसरण झाली. सिंधू त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दुसºया स्थानी होती. सायनाने एका स्थानाने प्रगती करत नववे स्थान मिळवले. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत सहाव्या स्थानी कायम असून समीर वर्माने १८ वे स्थान गाठले आहे.
सिंधू पुन्हा दुसऱ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 03:34 IST