शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंधू सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 00:39 IST

आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेती भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू मंगळवारपासून सुरु होत असलेल्या जपान ओपनमध्ये अंतिम फेरीत पराभूत होण्याचे दुष्टचक्र भेदण्यास प्रयत्नशील आहे.

टोकियो : आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेती भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू मंगळवारपासून सुरु होत असलेल्या जपान ओपनमध्ये अंतिम फेरीत पराभूत होण्याचे दुष्टचक्र भेदण्यास प्रयत्नशील आहे. सिंधूने यंदा सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकावले. त्यात राष्ट्रकुल स्पर्धा, विश्व चॅम्पियनशिप आणि आशियाई गेम्सचा समावेश आहे.आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला प्रदीर्घ कालावधीपासून फायनलचा अडथळा पार करता आलेला नाही. ती आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या सयाका ताकाहाशीविरुद्धच्या लढतीने करेल. उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ तीनवेळची विश्वचॅम्पियन कॅरोलिना मारिया किंवा जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध पडण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय विश्व चॅम्पियनशिप व आशियाई क्रीडामधील अपयश पुसून टाकण्याच्या निर्धाराने उतरतील. श्रीकांतला पहिल्या फेरीत चीनच्या हुआंग युशियांगच्या तर प्रणयला इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. समीर वर्माची लढत कोरियाच्या ली डोंग कियुनसोबत होईल. त्याचवेळी, बी. साई प्रणितने स्पर्धेतून माघार घेतली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू