शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सिंधू सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 4:49 AM

विश्व चॅम्पियनशीप बॅडमिंटन । साई प्रणितला कांस्यपदक

बासेल, स्वित्झर्लंण्ड : भारतीय स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने शनिवारी आॅल इंग्लंड चॅम्पियन चेन यु फेई हिला सरळ गेममध्ये पराभूत केले. आणि सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी प्रवेश केला. त्यामुळे ती आता विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. तर बी. साई प्रणित याला केंटो मोमोटा याने पराभूत केले. त्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

सिंधू हिने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. हैदराबादच्या खेळाडूने ४० मिनिटे चाललेय सामन्यात चीनच्या चेन यु फेई हिला २१-१७,२१-१४ असे पराभूत केले. २४ वर्षांच्या भारतीय खेळाडूला रविवारी थायलंडच्या २०१३ च्या विश्व चॅम्पियन रतचानोक इंतानोन आणि जापानच्या २०१७ च्या विजेत्या नोजोमी ओकुहरा हिच्या विरोधात होणाºया लढतीतील विजेत्याशी खेळावे लागेल.

आॅलिम्पिक रौप्य पदक विजेत्या सिंधू हिची चेन विरोधातील कामगिरी ५-३ अशी होती. तिने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. सिंधूने वेगवान शॉट आणि कमकुवत रिटर्न याचा फायदा घेतला. आणि आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत केले. पहिल्या ब्रेकमध्ये सिंधूने ११-३ अशी आघाडी घेतली. चेन खेळताना लाईनपासून दूर होत होती. त्यामुळे भारतीय खेळाडूला गुण मिळत गेले. पहिला गेम सिंधूने सहज जिंकला. दुसºया गेममध्ये चेनने शानदार सुरुवात केली. दोन्ही खेळाडू ३-३ अशा बरोबरीवर होत्या. मात्र चिनी खेळाडू चुका करत राहिली, त्यामुळे सिंधूने १०-६ अशी आघाडी घेतली. सिंधूने रॅली दरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूला जराही संधी दिली नाही. चेनने काही अनफोर्स्ड चुका केल्या. सिंधूने ही आघाडी १७-९ अशी केली. आणि गेम देखील जिंकला. दुसरीकडे प्रणित याने ५-३ अशी चांगली सुरुवात केली. मात्र मोमोटा याने ब्रेकपर्यंत ११-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतर लवकरच ४ गुण घेत १५-१० अशी आघाडी केली.साई प्रणितचा विक्रमबी साई प्रणित याचा विश्व चॅम्पिनयशिपमधील शानदार प्रवास संपुष्टात आला. त्याचा आक्रमक खेळ मोमोटाच्या बचावापुढे टिकू शकला नाही. ४१ मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या नंबर एक खेळाडू १३-२१,८-२१ पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर प्रणितने शानदार खेळ केला. ३६ वर्षांनंतर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू बनला. प्रकाश पदुकोण यांनी १९८३ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीत कांस्य पदकाची कमाई केली होती.

‘मी चांगल्या पद्धतीने तयार होते. आणि सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. अखेरीस विजय मिळवण्यात यशस्वी ठरले. दुसºया गेममध्ये मी काही चुका केल्या. मात्र नंतर घेतलेल्या आघाडीने आत्मविश्वास वाढला.’-पी.व्ही.सिंधू