शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारताची मदार सिंधू व श्रीकांतवर, दुखापतीतून सावरलेली फुलराणी विजेतेपदाच्या निर्धाराने सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:55 IST

जेतेपदाची प्रबळ दावेदार पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत जपान ओपनमधून झटपट गाशा गुंडाळावा लागल्याचे शल्य विसरून डेन्मार्क ओपन सुपर सीरिजमध्ये भारताला चागंली सुरुवात करून देण्याच्या निर्धाराने उतरतील.

ओडेंसे : जेतेपदाची प्रबळ दावेदार पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत जपान ओपनमधून झटपट गाशा गुंडाळावा लागल्याचे शल्य विसरून डेन्मार्क ओपन सुपर सीरिजमध्ये भारताला चागंली सुरुवात करून देण्याच्या निर्धाराने उतरतील.रिओ आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक विजेती सिंधू यंदाच्या मोसमात शानदार फॉर्मात आहे. तिने इंडिया ओपन व कोरिया ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवला आहे. सोलमध्ये गेल्या महिन्यात व्यस्त कार्यक्रमानंतर जपानच्या नोजोमी ओकुहाराविरुद्ध जपान ओपनच्या दुसºया फेरीत पराभूत झाली. दुसरे मानांकन प्राप्त सिंधू तीन आठवड्यांच्या सरावानंतर चमकदार कामगिरी करण्यास सज्ज झाली आहे. सिंधूला पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या चीनच्या चेन युफेईच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सिंधूने युफेईचा विश्व चॅम्पियनशिपमध्ये पराभव केला होता. चीनच्या सातव्या मानांकित बिंगजियाओची उपांत्य फेरीत सिंधूसोबत लढत होण्याची शक्यता आहे. तिची सिंधूविरुद्ध कामगिरी ५-४ अशी आहे.दुखापतीतून सावरल्यानंतर सायना नेहवाल गेल्या १६ महिन्यानंतर प्रथमच सुपर सीरिज विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहे. तिने जून २०१६ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिला गुडघ्याच्या दुखापतीने सतावले.जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सायनाने विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले आहे, पण तिला जपान ओपनमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सायनाला पहिल्या फेरीत मारिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या दोन्ही खेळाडूंची एकमेकींविरुद्धची कामगिरी ४-४ अशी आहे, पण यापूर्वी सायनाने दुबई विश्व सुपर सीरिजमध्ये २०१५ मध्ये मारिनचा पराभव केला होता.बी. साई प्रणीत व एच.एस.प्रणय यांनीही यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. प्रणीतने सिंगापूरमध्ये श्रीकांतचा पराभव करीत प्रथमच सुपर सीरिज जेतेपद पटकावले होते. प्रणयने अमेरिकन ओपन ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविण्याव्यतिरिक्त इंडोनेशिया ओपनमध्ये मलेशियाच्या ली चोंग वेई व चीनच्या चेंग लोंग यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना पराभूत केले.प्रणय व प्रणीत यांची लढत पहिल्या फेरीत अनुक्रमे डेन्मार्कचा एमिल होस्ट व हँस ख्रिस्टियन विटिंगुस यांच्यासोबत होईल. सैयद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकावणाºया समीर वर्माला सलामीला पात्रतेच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पुरुष दुहेरीमध्ये मनू अत्री व बी. सुमित रेड्डी आणि एस. रांकीरेड्डी व चिराग शेट्टी हे शर्यतीत आहेत. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांच्या कामगिरीवर नजर राहील. राष्ट्रकुल चॅम्पियन पी. कश्यप मंगळवारी डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेनविरुद्ध खेळेल. तर शुभंकर डेची लढत किम ब्रुनसोबत होईल.(वृत्तसंस्था)श्रीकांत जेतेपदाचा दावेदारपुरुष एकेरीत श्रीकांत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सहभागी होणार आहे. त्याने इंडोनेशिया व आॅस्ट्रेलियामध्ये जेतेपद पटकावले आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिप व जपान ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मंगळवारी त्याची लढत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाºया खेळाडूविरुद्ध होईल. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ विश्व चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलेसनविरुद्ध पडू शकते.

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा