शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सायना नेहवाल चीन ओपनमधून आऊट, जपानच्या अकाने यामागुची हिने केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 12:12 IST

भारताच्या सायना नेहवालचे चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

फुजोऊ - भारताच्या सायना नेहवालचे चीन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या बेईवान झँग हिला पराभूत करणाऱ्या सायनाला दुसऱ्या लढतीत जपानच्या पाचव्या मानांकीत  अकाने यामागुची हिचे आव्हान परतवून लावणे शक्य झाले नाही. या लढतीत सायनाला 18-21, 11-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. या लढतीत सायनाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्याच गेममध्ये सायनाचे आव्हान मोडीत काढताना यामागुची हिने गेम 21-18 अशा फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने संपूर्ण वर्चस्व राखत सायनाला 11-21 अशी मात दिली आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. पहिल्या फेरीत सायनाने अमेरिकेच्या बेइवान झैंग हिला केवळ ३० मिनिटांमध्ये २१-१२, २१-१३ असे नमवून शानदार आगेकूच केली होती. त्याआधी काल लागलेल्या एका धक्कादायक निकालामध्ये पाचवेळचा जागतिक आणि दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लीन डॅनचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक पराभव झाला होता.   तब्बल ७ मॅच पॉइंट वाचवल्यानंतर लीनला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला हे विशेष. इंडोनेशियाचा जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्टी याने लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला होता.  जोनाथनने दोन गेमपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात खळबळ माजवताना बलाढ्य लीनचे २१-१९, २१-१६ असे आव्हान संपुष्टात आणले. दरम्यान, या पराभवानंतर लवकर हा दिग्गज खेळाडू आपल्या निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाचवेळा चायना ओपनचे जेतेपद उंचावलेल्या अनुभवी लीनकडून या सामन्यात अनेक चुका झाल्या. याचा पुरेपूर फायदा घेताना जोनाथनने ४२ मिनिटांमध्येच लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. मलेशियाच्या ली चोंग वेई याने मात्र सहज विजयी सलामी देत तैवानच्या सुह जेनहाओ याचा २१-५, २१-७ असा फडशा पाडला.  

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा