शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाची वाटचाल खडतर, सायना नेहवाल, एचएस प्रणॉयची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 03:34 IST

दुखापतग्रस्त एचएस प्रणॉयची जाणवणारी अनुपस्थिती आणि स्टार खेळाडू सायना नेहवालने घेतलेली माघार यामुळे मंगळवारपासून सुरु होत असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचा प्रवास सोपा नसेल.

एलोर सेतार : दुखापतग्रस्त एचएस प्रणॉयची जाणवणारी अनुपस्थिती आणि स्टार खेळाडू सायना नेहवालने घेतलेली माघार यामुळे मंगळवारपासून सुरु होत असलेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचा प्रवास सोपा नसेल. या स्पर्धेत किदाम्बी भारताच्या पुरुषांचे, तर पीव्ही सिंधू महिला संघाचे नेतृत्त्व करणार आहे.विशेष म्हणजे आशिया सांघिक अजिंक्यपद २० मे पासून बँकॉक येथे सुरु होणाºया थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी पात्रता फेरी असल्याने भारतासाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेतील अव्वल चार संघ थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.भारतीय पुरुष संघाचा ‘ड’ गटामध्ये समावेश असून यामध्ये फिलिपीन्स, मालदीव आणि इंडोनेशिया या मजबूत संघांचाही समावेश आहे. फिलिपीन्सविरुद्धच्या सामन्याने भारतीय पुरुषांच्या मोहिमेला सुरुवात होईल. दरम्यान, प्रणॉयच्या अनुपस्थितीमध्ये भारताला तीन एकेरीचे सामने जिंकवण्याची जबाबदारी किदाम्बीसह बी. साई प्रणीत आणि समीर वर्मा यांच्यावर असेल.महिलांच्या संघामध्ये सायनाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. बर्मिंघम येथे १४ - १८ मार्च दरम्यान होणाºया आॅल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीसाठी सायनानेमाघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकेरी लढतीमध्ये भारताची मदार सिंधू, युवा खेळाडू कृष्णाप्रिया आणि रुत्विका गाडेयांच्यावर असेल. ‘डब्ल्यू’ गटामध्ये समावेश असलेल्या भारतीयांना साखळी फेरीत जपान आणि हाँगकाँग यांच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadminton