शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायना नेहवालचे पदक निश्चित, स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 09:11 IST

भारताची फुलराणी आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौरचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

ग्लास्गो, दि. 26 - भारताची फुलराणी आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौरचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. याआधी रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने सुद्धा उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताला दोन पदके निश्चित झाली आहेत.उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवाल हिचा स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौर विरुद्ध सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने क्रिस्टी गिलमौर हिचा 21-19, 18-21, 21-15 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि नोजोमि ओकुहारा यांच्यात लढत  होणार आहे. त्याआधी रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनची सून यू हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय नोंदवित किमान कांस्य पदक निश्चित केले. 2013 आणि 2014 मध्ये कांस्य जिंकणा-या 22 वर्षांच्या सिंधूने शुक्रवारी 39 मिनिटांत 21-14, 21-9 अशा फरकाने विजय साजरा केला. विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सिंधूची उपांत्य फेरीत दहाव्या स्थानावर असलेली चीनची चेन युफेईविरुद्ध गाठ पडणार आहे. युफेईने थायलंडची माजी चॅम्पियन रतनचोक इंतानोन हिच्यावर विजय नोंदविला.श्रीकांतला पदकाचा प्रबळ दावेदार समजले जात होते. इंडोनेशिया तसेच ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये जेतेपद तसेच सिंगापूर ओपनमध्ये दुस-या स्थानावर राहिलेला श्रीकांत फॉर्ममध्ये होता. तथापि कोरियाच्या सीन वान याने त्याच्यावर 49 मिनिटांत विजय मिळविला. डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सलसन आणि पाच वेळेचा चॅम्पियन लिन दान हे देखील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल झाले.

श्रीकांत स्पर्धेबाहेरदुसरीकडे श्रीकांतची सुरुवात खराब झाल्याने वानने लवकरच मोठी आघाडी संपादन केली. पण श्रीकांतला उशिरा सूर गवसताच गेममध्ये 8-8 अशी बरोबरी झाली होती. श्रीकांतने केलेल्या काही चुकांचा देखील त्याला फटका बसला. दुसºया गेमच्या सुरुवातीला प्रतिस्पर्धी खेळाडूने आघाडी मिळविल्यानंतर श्रीकांतने सलग सात गुणांची कमाई करताच गुणसंख्या 12-16 अशी झाली होती. श्रीकांतने काही फटके बाहेर मारताच कोरियाच्या खेळाडूचा विजय साकार झाला तर सलग 13 सामने जिंकण्याचे श्रीकांतचे स्वप्न मात्र भंगले.श्रीकांतने या लढतीपूर्वी जून महिन्यात सोन वानविरुद्ध (इंडोनेशिया सुपर सीरिज व आॅस्ट्रेलिया सुपर सीरिज) दोन सामन्यांत विजय मिळवला होता, पण आजच्या लढतीत मात्र त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. कोरियन खेळाडूने शानदार कामगिरी करताना 49 मिनिटे रंगलेल्या लढतीत 21-14,21- ने विजय मिळवला. दुस-या गेममध्ये श्रीकांत सुरुवातीला संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. सोन वानने 7 गुणांची आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर श्रीकांतने काही गुण घेतले, पण कोरियन खेळाडूने 13-5 अशी आघाडी घेतली होती.