शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भविष्यात सायनाविरुद्ध विश्व चॅम्पियनशिपमध्ये अंतिम लढत रंगण्याची शक्यता - पी. व्ही. सिंधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:08 IST

अलीकडेच विश्व चॅम्पियनशिपच्या मॅरेथॉन फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रौप्यपदकावर समाधान मानाव्या लागलेल्या पी. व्ही. सिंधूच्या मते आता आंतरराष्ट्रीय सामने चुरशीचे झाले असून, त्यात मोठ्या रॅलींची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

हैदराबाद : अलीकडेच विश्व चॅम्पियनशिपच्या मॅरेथॉन फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रौप्यपदकावर समाधान मानाव्या लागलेल्या पी. व्ही. सिंधूच्या मते आता आंतरराष्ट्रीय सामने चुरशीचे झाले असून, त्यात मोठ्या रॅलींची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.सिंधू आणि जपानची नोजोमी ओकुहारा यांच्यादरम्यान प्रदीर्घ रॅली रंगल्या. त्यात एक रॅली तर ७३ शॉटची होती. उभय खेळाडूंदरम्यान लढत १ तास ५० मिनिटे रंगली. त्यात भारतीय खेळाडूला थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मंगळवारी मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘आता खेळ सोपा राहिलेला नाही. कारण महिला एकेरी, पुरुष एकेरी आणि दुहेरीच्या लढतींमध्ये प्रदीर्घ रॅली रंगत असल्याचे निदर्शनास येते.’हैदराबादच्या या २२ वर्षीय खेळाडूने २०१३ व २०१४ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते. सिंधू म्हणाली, ‘कुठल्याही खेळाडूला सहज गुण मिळवता येत नाही. प्रत्येक गुणासाठी संघर्ष करावा लागतो.’रंगतदार अंतिम लढतीबाबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘मानसिक व शारीरिकदृष्ट्या ही लढत थकविणारी होती; पण त्या वेळी केवळ गुण वसूल करण्याबाबत विचार सुरू असतो, कारण ही विश्व चॅम्पियनशिपची अंतिम लढत आहे. मी खेळत होते. माझ्याप्रमाणे तीसुद्धा थकलेली होती. ७३ शॉटची रॅली कुठल्याही लढतीत प्रथमच खेळली गेली असावी.’सिंधू म्हणाली, ‘मी खूष आहे. रिओ आॅलिम्पिकनंतर ही सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक आहे. विश्व चॅम्पियनशिप अन्य स्पर्धांच्या तुलनेत वेगळी असते. यापूर्वी मला दोनदा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, पण या वेळी मी पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी ठरले.’भविष्यात माझ्या व सायनादरम्यान विश्व चॅम्पियनशिपची अंतिम लढत रंगण्याची शक्यता आहे. या वेळी हे घडले नाही; पण भविष्यात घडण्याची शक्यता आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी बराच वेळ मिळाला. आम्ही कसून मेहनत घेतली. आम्हाला स्पर्धेदरम्यान अधिक वेळ मिळत नाही. एक किंवा दोन आठवड्यांचा वेळ असतो. आम्ही स्पर्धेसाठी जातो आणि परत येतो. पण, या वेळी विश्व चॅम्पियनशिपपूर्वी किमान दोन महिन्यांचा कालावधी मिळाला. - पी. व्ही. सिंधू