शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रशियन ओपन बॅडमिंटन : सौरभ, कुहू-रोहन अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 05:24 IST

माजी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा याने शनिवारी येथे सुरू असलेल्या ७५००० डॉलर पारितोषिक रकमेच्या रशियन ओपन टूर सुपर-१०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली.

ब्लादिवोस्तव (रशिया) : माजी राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्मा याने शनिवारी येथे सुरू असलेल्या ७५००० डॉलर पारितोषिक रकमेच्या रशियन ओपन टूर सुपर-१०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. २५ वर्षांच्या सौरभने आपलाच सहकारी मिथुन मंजुनाथ याच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदविला. अंतिम फेरीत सौरभची गाठ जपानच्या कोकी वाटांबेशी पडणार आहे.जखमेतून सावरलेल्या सौरभने उपांत्य फेरीत केवळ ३१ मिनिटांत२१-९,२१-१५ने मिथुनवर मात केली. चीन तैपेई मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या सौरभने आजच्या सामन्यातही आपला वरचष्मा कायम राखला. दोन्ही सेट्समध्ये सौरभकडे६ गुणांची भक्कम आघाडी होती. दुस-या सेटमध्ये मिथुनने पुनरागमन करत सौरभला धक्का दिला. मात्र तिसºया सेटमध्ये अनुभव पणाला लावत सौरभने सामन्यात बाजी मारली.कुहू गर्ग-रोहन कपूर या मिश्र जोडीने शानदार फॉर्म कायम राखून अंतिम फेरीत धडक दिली आहे. चेन टांग जी आणि येन वेई पॅक या दुस-या मानांकित मलेशियाच्या जोडीवर त्यांनी ५८ मिनिटांत २१-१९,११-२१,२२-२० असा संघर्षपूर्ण विजय नोंदविला. या जोडीला आता यजमान जोडी ब्लादिमीर इवानोव- मिन क्यूंग किम यांच्याविरुद्ध लढत द्यावी लागेल.दुसरीकडे भारताच्या पुरुष दुहेरी जोडीला मात्र उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अरुण जॉर्ज-संयम शुक्ला यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाचा धक्का बसला. त्यांना कॉन्स्टेनटाईन अबरामोव- अलेक्झांडर जिनचेंको या दुसºया मानांकित जोडीने २१-१५,२१-१९ अशा फरकाने पराभूत केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा