शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक, चीनच्या खेळाडूवर केली मात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 07:04 IST

रिओ ऑॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने चीनच्या चेन युफेईवर मात करत विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

ग्लास्गो, दि. 27 - रिओ ऑॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने चीनच्या चेन युफेईवर मात करत विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 

2013 आणि 2014 मध्ये कांस्य पदक जिंकणा-या 22 वर्षांच्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी झालेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफेईवर 48 मिनिटांत  21-13, 21-10  अशा फरकाने विजय मिळवला. विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठणारी पी. व्ही. सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे. तर, उपात्यंपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूने  विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनच्याच सून यू हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवित कास्य पदक निश्चित केले होते. यावेळी सून यू हिच्यावर 39 मिनिटांत 21-14, 21-9 अशी मात करत पी.व्ही. सिंधूने उपांत्य फेरी गाठली होती.

आता अंतिम फेरीत पी. व्ही. सिंधू आणि जपानची नोजोमी ओकुहारा यांच्यात लढत होणार आहे. नोजोमी ओकुहारा हिने शनिवारी भारताची फुलराणी आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सायना नेहवाल हिला विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी नोजोमीने 12-21, 21-17, 21-10 अशा सरळ सेटमध्ये सायना नेहवालचा पराभव केला.

दरम्यान, पी.व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी तिला ट्विटरच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.