शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

पीबीएल : नॉर्थईस्ट वॉरीयर्स संघाचा दमदार विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 1:49 AM

येथील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) सामन्यात नॉर्थ ईस्ट वॉरीयर्सने बंगळुरू ब्लास्टर्सचा ३-२ ने पराभव केला.

- आकाश नेवेचेन्नई : येथील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) सामन्यात नॉर्थ ईस्ट वॉरीयर्सने बंगळुरू ब्लास्टर्सचा ३-२ ने पराभव केला. बंगळुरूचे इतर खेळाडू पराभूत होत असताना व्हिक्टर अलेक्सेनसेन याने वेंग वेई याचा ९-१५, १५-१३, १५-१४ असा पराभव केला.पहिल्या पुरूष दुहेरीच्या सामन्यात बंगळुरूच्या बोइ आणि मान यांनी जुआ आणि चेल यांना १५-१२, ७-१५, १५-१२ असे पराभूत केले. यानंतर अजय जयरामने वॉरीयर्सला बरोबरी साधून देताना चोंग वेइ फेंग याचा सरळ गेममध्ये १५-८, १५-१३ असा पराभव केला. या ट्रम्प सामन्यातील पराभवाने बंगळुरूला एका गुणाचे नुकसान सहन करावे लागल्याने ते ०-२ असे पिछाडीवर पडले.महिला एकेरीत मिशेल ली हिने आपल्या ट्रम्प लढतीत अपेक्षित निकाल लावताना बंगळुरुच्या किरस्टी गिलमोर हिचा ७-१५, १५-१४, १५-१३ असा पराभव करत संघाला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर केवळ औपचारिकता राहिलेल्या पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत बंगळुरुने बाजी मारली खरी, परंतु ट्रम्प लढत गमावल्याने त्यांना सामन्यात पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत व्हिक्टरने बाजी मारल्यानंतर मिश्र दुहेरीत मनु अत्री - एन. सिक्की रेड्डी यांनी नॉर्थइस्टच्या शिनबेक चेओल - प्राजक्ता सावंत यांचा १२-१५, १५-८, १५-९ असा पराभव केला.

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा