शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पीबीएल : कॅरोलिनाचा सायनावर विजय, श्रीकांत आणि कश्यपही पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:19 IST

हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या लढतीत दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या कॅरोलिना मरिन हिने अवध वॉरियर्सच्या सायना नेहवालला १५-५, १५-७ असे पराभूत केले. त्यासोबतच अवध वॉरियर्सच्या पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत या स्टार खेळाडूंनादेखील या लढतीत पराभवाचा धक्का बसला.

चेन्नई : हैदराबाद हंटर्सने प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या लढतीत दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या कॅरोलिना मरिन हिने अवध वॉरियर्सच्या सायना नेहवालला १५-५, १५-७ असे पराभूत केले. त्यासोबतच अवध वॉरियर्सच्या पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत या स्टार खेळाडूंनादेखील या लढतीत पराभवाचा धक्का बसला.रविवारी सायंकाळी येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या पीबीएलच्या या लढतीत हैदराबाद हंटर्सच्या खेळाडूंनी अवध वॉरियर्सवर वर्चस्व गाजवले. हैदराबादच्या ली हुएन एल याने अवधच्या पारुपल्ली कश्यप याला १३-१५, १५-९, १५-१४ असे पराभूत केले. कश्यप याने पहिला गेम जिंकला, मात्र त्यानंतर त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अवध संघाच्या किदाम्बी श्रीकांत यालादेखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हैदराबादच्या बी. साई प्रणित याने श्रीकांतला सरळ गेममध्ये १५-१०, १५-१० असे पराभूत केले. या संपूर्ण सामन्यावर साई प्रणित याने वर्चस्व राखले. काही वेळा या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅली रंगल्या, मात्र साई प्रणित याने सरशी साधली. मरिन हिने सायना नेहवालवर एकतर्फी विजय मिळवला. मरिन हिने सायनाला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही. पुरुष दुहेरीत हैदराबादच्या मार्किस किडो आणि यु युन सेऊंग यांनी अवधच्या चीन चुंग आणि तांग मान यांचा १४-१५, १५-६, १५-११ असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या सामन्यात हैदराबादच्या पिया झेबदीएह बर्नाडिक्ट आणि सात्विकसाईराज वेंकारेड्डी यांनी अवधच्या ख्रिस्तिना पेडरसन आणि हेंद्रा सेतीयावान यांच्यावर १५-९, १५-९ असा विजय मिळवला. अवध वॉरियर्सला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नाही.आकाश नेवे

टॅग्स :Premier Badminton Leagueप्रीमियर बॅडमिंटन लीगSaina Nehwalसायना नेहवालKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांत