शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधूने रचला इतिहास, World Tour Finals स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 12:24 IST

भारताच्या पी. व्ही. सिंधूने BWF World Tour Finals स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद पटकावले.

ठळक मुद्देभारताच्या पी. व्ही. सिंधूने BWF World Tour Finals स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद पटकावले.2018 मधील पहिलेच जेतेपद

ग्वांग्यू : भारताच्या पी. व्ही. सिंधूने BWF World Tour Finals स्पर्धेतील महिला गटाचे जेतेपद पटकावले. तिने कारकिर्दीतील 300व्या विजयाची नोंद करताना जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव केला. BWF World Tour Finals स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. तसेच 2018 मधील तिचे हे पहिलेच जेतेपद आहे. 23 वर्षीय सिंधूने अंतिम लढतीत 21-19, 21-17 असा विजय मिळवला. सिंधूचे हे कारकिर्दीतील 14वे जेतेपद आहे. 2013 साली सिंधूने येथेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिले पदक जिंकले होते आणि रविवारी तिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने जपानी खेळाडूचा कडवा संघर्ष मोडून काढताना तंदुरूस्ती आणि मानसिक कणखरतेची प्रचिती दिली. 2018 मध्ये सिंधूला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही, परंतु तिने वर्षाअखेरच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बाजी मारली. याआधी 2009 मध्ये वाँग मेव चूने केवळ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. 2018 मध्ये सिंधूला सलग सात स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता आणि त्यात आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धांचाही समावेश आहे. आजच्या लढतीत सिंधूने आक्रमक खेळ करताना 7-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर 13व्या गुणासाठी सिंधू व ओकुहारा यांच्यात 44 फटक्यांची रॅली रंगली. सिंधूने सामन्यावर पकड घेताना आघाडी 14-6 अशी मजबूत केली. मात्र, 2017च्या विश्वविजेत्या ओकुहाराने 12 पैकी 10 गुण घेत सामना 16-16 असा बरोबरीत आणला. सिंधूने तणाव न घेता सातत्यपूर्ण खेळ करताना पहिला गेम 21-19 असा घेतला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने झटपट गुण कमावले, परंतु ओकुहारानेही कडवा प्रतिकार केला. सिंधूने हा गेम 21-17 असा घेत इतिहास घडवला. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton