शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. सिंधूची दुस-या स्थानी झेप, जागतिक क्रमवारीत सायना, श्रीकांतचे स्थान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 03:59 IST

रिओ आॅलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती स्टार शटलर पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत द्वितीय स्थानी पोहचली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बीएफडब्ल्यू क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंना फारसा फटका बसलेला नाही.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती स्टार शटलर पी. व्ही. सिंधू जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत द्वितीय स्थानी पोहचली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या ताज्या बीएफडब्ल्यू क्रमवारीमध्ये भारतीय खेळाडूंना फारसा फटका बसलेला नाही.नुकताच कोरिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावलेल्या सिंधूने कारकिर्दीमध्ये दुसºयांदा जागतिक क्रमवारीत दुसर स्थान मिळवले आहे. याआधी सहा एप्रिलला जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये सिंधू दुसºया स्थानी आली होती. त्याचवेळी, ‘फुलराणी’ सायना नेहवालच्या क्रमवारीमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. नव्या क्रमवारीमध्ये सायनाचे १२वे स्थान कायम राहिले आहे. विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन स्पेनच्या कॅरोलिना मरिननेही आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. त्याचवेळी, वर्ल्ड चॅम्पियन जापानची नोजोमी ओकुहाराने आपल्या क्रमवारीमध्ये एका स्थानाने प्रगती करताना आठवे स्थान पटकावले आहे.पुरुषांमध्ये भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत आठव्या स्थानी कायम आहे. त्याचवेळी, बी. साई प्रणीत आणि एच. एस. प्रणॉय यांना एका स्थानाचे नुकसान झाले असून दोघेही अनुक्रमे १७व्या आणि १९व्या स्थानी आले आहेत. अजय जयरामच्या क्रमवारीमध्ये तीन स्थानांची घसरण झाली असून तो २०व्या स्थानी आला आहे. (वृत्तसंस्था)