शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षकांसाठी शिबिर आयोजिण्याची गरज - प्रकाश पदुकोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:46 IST

भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मुंबई : भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर खूप मोठी मजल मारत आहेत. पण असे असले, तरी सध्या भारताला मोठ्या प्रमाणात गुणवान प्रशिक्षक घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपल्याकडे सध्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षकांची संख्या कमी असून, असे प्रशिक्षक घडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे,’ असे स्पष्टमत भारताचे माजी दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.मुंबईतील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे मंगळवारी पदुकोण यांच्या वतीने इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या वेळी प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजिण्याचे आवश्यक असल्याचे सांगताना पदुकोण म्हणाले, ‘‘आज आपल्याकडे खूप कमी प्रशिक्षित किंवा उच्च दर्जाचे प्रशिक्षक आहेत. यासाठी आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, परंतु राष्ट्रीय संघटनेच्या वतीने यावर काम सुरू आहे. तसेच, आपल्याकडे खूप चांगले प्रशिक्षक आहेत, पण त्यांना आवश्यक संधी मिळत नसल्याने त्यांचे नुकसान भारतीय बॅडमिंटनला होत आहे. मात्र, भविष्यामध्ये हे चित्र नक्कीच बदलेल, याची मला खात्री आहे.’’खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा विचार करता नुकताच किदाम्बी श्रीकांतने घेतलेला निर्णय खूप अचूक होता. त्याने आगामी दुबई स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी इतर सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेत अतिरिक्त सामने खेळण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. तो दुबई स्पर्धेत जिंकेल की नाही, हे मी सांगू शकत नाही; पण एक मात्र नक्की, की या स्पर्धेत पूर्णपणे सज्ज होण्यासाठी त्याने पुरेसा वेळ मिळवला. शिवाय महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्यानंतर तुम्ही आपोआप अव्वल स्थानी पोहोचता. त्यामुळे खेळाडूंनी महत्त्वाच्या स्पर्धेत केवळ सहभागी न होता त्या स्पर्धा जिंकाव्यात. - प्रकाश पदुकोण

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत