शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मुंबईकर मानसी पदक मिळवण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 03:29 IST

कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते.

मुंबई : कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता अखेरपर्यंत आपले लक्ष्य साध्य करण्याची जिद्द प्रत्येक खेळाडूमध्ये दिसून येते. भले यश मिळो अथवा नको, पण शेवटपर्यंत लढत राहण्याचा निश्चय पत्येक खेळाडूमध्ये पाहायला मिळतो. अशीच जिद्द मुंबईकर बॅडमिंटनपटू मानसी जोशीमध्ये दिसून येत आहे. अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही न डगमगता ती आगामी पॅरा आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावण्यास सज्ज झाली आहे.एका भीषण रस्ता अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतर २९ वर्षीय मानसीचा आत्मविश्वास जराही कमी झाला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न तिने कधीही सोडले नाही आणि आता तिने बॅडमिंटन गुरु पुलेल्ला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ला आगामी पॅरा आशियाई स्पर्धेसाठी सज्ज केले आहे. मुळची मुंबईची असलेली मानसी गेल्या एक महिन्यापासून गोपीचंद अकादमीमध्ये सराव करीत असून जकार्तामध्ये आॅक्टोबर महिन्यात होत असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत ती सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.डिसेंबर २०११ साली झालेल्या एका भीषण रस्ता अपघातामध्ये मानसीने आपला एक पाय गमावला. यानंतर ती पुन्हा कोर्टवर उतरेल की नाही अशी शंका होती. मात्र, मानसीही हार न मानता मोठ्या जिद्दिने पुनरागमन केले आहे. तिने आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ न देता सराव कायम राखला. मानसी म्हणाली की, ‘मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळते. अपघात झाल्यानंतरही मी हार मानली नाही आणि माझ खेळ सुरु ठेवला.’ दखल घेण्याची बाब म्हणजे कृत्रिम पायाच्या सहाय्याने खेळत असलेल्या मानसीने अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व केलेल्या मानसीने अनेक पदकांची कमाईही केली आहे.मानसीने पुढे म्हटले की, ‘मुंबईत रिहॅबिलिटेशन क्लिनिकमध्ये सर्वप्रथम कृत्रिम पाय लावला. ज्या कृत्रिम पायाचा मी वापर करते त्यात सेंसर लावण्यात आहेत.’ मानसीची कठोर मेहनत पाहून प्रशिक्षक गोपीचंदही प्रभावित झाले. ती सर्वच लोकांसाठी एक प्रेरणास्थान असल्याचे वक्तव्य गोपीचंद यांनी केले आहे. गोपीचंद म्हणाले की, ‘पॅरा बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्यासाठी अनेक संधी असतात. ती अत्यंत महेनती आहे. तीचा झुंजार खेळ पाहून खूप चांगले वाटते. अनेक सक्षम लोकांसाठी ती प्रेरणास्थान आहे. ती स्पर्धेत नक्कीच यशस्वी कामगिरी करेल.’>सरकारकडून अपेक्षामानसीला कृत्रिम पायाच्या खर्चाचे ओझे वाहून खेळावे लागत आहे. तिने सांगितले की, ‘मी जो कृत्रिम पाय वापरते तो खूप महाग आहे. मला आशा आहे की, यामध्ये मला सरकारकडून काहीप्रमाणात सूट मिळेल. कृत्रिम अवयवांमध्ये नुकताच ५ टक्के जीएसटी जोडण्यात आला आहे. कृत्रिम पायाची किंमत २० लाख रुपये असून दर पाच वर्षांनी हा पाय बदलावा लागतो. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या कितीही सक्षम असाल, तरी हे एक ओझेच आहे.’